सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ पाहून खरंच अवाक् व्हायला होतं. अनेक थरारक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये अनेक साहसी खेळांचे व्हिडीओ पाहायला मिळतात. झोपाळ्यावर बसून उंच उंच उडायला कुणाला आवडत नाही. प्रत्येकाला वाटतं की, आपण झोपाळ्यावर बसून उंच उडावं. पण, काही लोकांना तर यापुढेही जाऊन उंचावर असलेल्या झोपाळ्यावर बसून अधिक उंच उडण्याची हौस असते.

आजकाल अनेक पर्यटनस्थळी उंच डोंगरावर, खोल दरीच्या टोकाला झोक्यावर बसण्याचा आनंद अनेक जण घेतात. अशा झोक्यावर बसणे साहसी खेळ म्हणून पाहिले जाते. त्याचबरोबर निसर्गरम्य ठिकाणी अशा झोक्यावर बसून फोटो शूट करण्याचा नवा ट्रेंड आला आहे. सोशल मीडियावर अशा झोक्यावर बसलेल्या पर्यटकांचे फोटो व्हायरल होत असतात. दरम्यान, अशाच एका झोक्याचा आनंद घेणाऱ्या तरुणाला जन्माची अद्दल घडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
shocking video : parents should take care of their children.
VIDEO : पालकांनो, तुमची मुले करू शकतात अशा चुका! चिमुकला अडकला लिफ्टमध्ये; पाहा, पुढे काय घडले?

सोशल मीडियावर दररोज इतर व्हिडीओंप्रमाणे धोकादायक व्हिडीओही व्हायरल होत असतात. असे अनेक व्हिडीओ आहेत, जे आश्चर्यचकित करणारे असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर आपला डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक व्हिडीओ आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत, जो पाहून काळजाचा ठोका चुकेल. खरं तर, एक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामध्ये काही मित्रांच्या मस्तीवर जणू पडछाया पडली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अनेक मित्र रस्त्याच्या कडेला मस्ती करताना दिसत आहेत.

(हे ही वाचा : रेल्वे फाटक ओलांडताना अडकली SUV कार अन् तेवढ्यात पाठीमागून भरधाव आली ट्रेन अन् १६ सेकंदांत घडलं काय; पाहा व्हिडीओ )

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, डोंगराच्या टोकाला काही पर्यटक मित्र झोका घेताना दिसत आहेत. या पर्यटकांनी झाडाची फांदी पकडून झोका घ्यायला सुरुवात केली आहे. पहिला मित्र जातो आणि फांदीला पकडून झोका घेतो. पण, जेव्हा दुसरा मित्र झोका घ्यायला जातो तेव्हा त्या तरुणाला त्याचे काय होणार आहे याची काहीही कल्पना नसते. तो स्विंग करीत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी झाडाची फांदी तुटून तरुण थेट खड्ड्यात पडला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तरुण पडताच लोक त्याला वाचविण्यासाठी खड्ड्याच्या दिशेने जातात. हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

येथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ एका युजरने शेअर केला आहे. वृत्त लिहेपर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. X वापरकर्त्यांच्या प्रतिक्रियादेखील व्हिडीओवर पाहता येतील. एका युजरने लिहिले, “भाऊ, अशा प्रकारची मजा खूप कठीण आहे.” एका युजरने लिहिले, “मजा चांगली आहे; पण एवढी मजा नको की एखाद्याचा जीव घेईल.” एका युजरने लिहिले, “भाऊ, नशीब खराब असेल तर काहीही होऊ शकते.” एका युजरने लिहिले, “आता तो आयुष्यात अशी मजा कधीच करू शकणार नाही. कारण- त्याने आपला मित्र गमावला आहे.”

Story img Loader