Railway accident video viral: रेल्वे अपघाताच्या रोज अनेक बातम्या आपण ऐकत असतो. त्यापैकी बरेच अपघात हे त्यांच्या स्वत:च्याच चुकीमुळे झालेले असतात. कधी धावत्या लोकलमध्ये चढताना पाय घसरतो, कधी दरवाजात उभे असताना तोल जातो. दरम्यान, तुम्ही पाहिलं असेल की, रेल्वेत वेगवेगळे पदार्थांच्या विक्रेत्यांचीही गर्दी असते. तेसुद्धा चालत्या ट्रेनमधून सहजपणे चढ-उतार करताना दिसतात. कधी कधी तर ते प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर धावत धावतही पदार्थ विकतात. अशाच एका विक्रेत्याला धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात अपघात झाला आहे. तो धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
ट्रेनमध्ये चढताना घसरला अन्
रेल्वे अपघात काही नवे नाहीत; मात्र अशा प्रकारे विक्रेत्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचाही जीव जाऊ शकतो आणि एखाद्या प्रवाशाचाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबली आहे. यावेळी काही विक्रेते ट्रेनच्या दुसऱ्या बाजूला रुळांवर उतरले आहेत, आणि तिथून ते प्रवाशांना पदार्थ विकत आहेत. यावेळी एक विक्रेता पाण्याच्या बाटल्यांची विक्री करण्यासाठी उभा आहे. दरम्यान, ट्रेन चालू होते आणि हा एवढ्या बाटल्या खांद्यावर घेऊन धावत धावत ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतो; मात्र त्याचा अंदाज चुकतो आणि तो अडखळत तिथेच उलटा पडतो.
अंगावर काटा आणणारा Video होतोय व्हायरल
यावेळी तो थोडासाही दुसऱ्या दिशेला पडला असता, तर थेट ट्रेनखाली गेला असता. सुदैवानं त्याचा यामध्ये जीव गेला नाही, तर त्याला फक्त दुखापत झाली आहे. या विक्रेत्याचा कधी कधी प्रवाशांनाही त्रास होतो. त्यांची दहा वेळा ये-जा, आवाज यामुळे प्रवासीही वैतागतात. मात्र प्रत्येकाला पोटासाठी संघर्ष करावाच लागतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> पुलावरून थेट खाली गेला असता; पण…हेल्मेटनं मृत्यू रोखला; गुजरातमधील अपघाताचा VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका!
व्हिडीओमध्ये अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे, याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणाच्याही अंगावर काटा येईल. रेल्वे अपघाताचा हा व्हिडीओ मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.