Viral video: काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. सर्कस म्हंटलं की वेगवेगळे स्टंट आलेच. या सर्कसमध्ये वेगवगळे स्टंट करताना बऱ्याचदा तुम्ही तिथल्या खेळाडूंचे अपघातही झालेले पाहिले असतील. कितीही तरबेज हे खेळाडू असले तरीही, छोट्याश्या चुकांमुळे हे अपघात होतात. दरम्यान अशाच एका सर्कसमध्ये कलाकार आपली कला सादर करताना, मोठा अपघात झाला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कधी एखाद्या दोरीचा आधार घेऊन, तर कधी लोंखडी स्टँडवर हे स्टंट करतात. यामध्ये कितीही रिस्क असली तरीही शेवटी पोटासाठी हे कलाकारांना, खेळाडूंना करावंच लागतं. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका मोकळ्या जागेत सर्कस भरवला आहे. बघण्यासाठी लोकही जमलेले आहेत. या परिसरात मोठमोठे बांबू रोवले आहेत, त्यावर दोरी बांधली आहे. यावेळी हा खेळ सुरु होतो आणि एक व्यक्ती आपली कला, स्टंट दाखवण्यासाठी दोरीवर चालू लागतो मात्र तेवढ्यात कुणालाही कल्पना नसताना मोठा अपघात होतो. जमीनीत रोवलेले बांबू कोसळतात आणि तो व्यक्तीही क्षणात खाली पडतो. यावेळी सगळ्यांचाच थरकाप उडतो.

यानंतर आजबाजूचे लोक त्याच्या मदतीसाठी धावून जातात मात्र इतक्या उंचीवरुन पडल्यामुळे त्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असणार हे व्हिडीओ पाहून लक्षात येतं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> सिग्नलवर थांबलेल्या तरुणाला तृतीयपंथीयाने पैसे मागितले, नाही म्हणताच केलं असं काही की…VIDEO पाहून व्हाल अवाक्

सोशल मीडियात व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक प्रतिक्रिया देत आहे. सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. जगाच्या कान्याकोपऱ्यांतील घटना आजकाल सहजपणे आपल्यापर्यंत पोहोचते. हा व्हिडीओ @TheWapplehouse या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर देत आहेत.