Viral Video : आपण कोणतेही काम केले तर त्याचे फळ आपल्याला मिळते. वाईट किंवा चांगले कसलेही काम केले तर त्याचे आपल्याला कधी ना कधी फळ मिळतेच असं म्हणतात. वाईट कामाचे फळही वाईटच मिळते. त्यामुळे वाईट काम करताना किंवा एखाद्याचे नुकसान करताना विचार करायला पाहिजे. सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एका व्यक्तीला आपल्या कर्माचं फळ काही सेकंदातच मिळालं आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये व्यक्तीला काहीतरी वेगळंच करायचं होतं पण घडलं भलतंच. हा मजेदार व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने दारूची बाटली चोरण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. मात्र या कामात तो अपयशी ठरला. आपलं हे कृत्य लपवण्यासाठी त्याने पळून जाण्याचा निर्णय घेतला. पण कर्माने त्याला लगेच धडा शिकवला. लपवलेली बॉटल खाली पडली, फुटली आणि त्यातच तो घसरुन पडला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Shocking: कचऱ्यात फेकलेल्या पेटिंगला मिळाले १.५८ कोटी, एवढं त्यात होतं तरी काय?
दरम्यान, ही घटना फक्त दोन ते तीन सेकंदाच्या आतमध्ये घडली आहे. सदर व्यक्तीला आपल्या वाईट कर्माचे फळ काही क्षणातच मिळाले आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाईट काम करण्यापासून दूर राहण्याची प्रेरणा मिळेल.