सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे, जेथे आपल्या नवनवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपलं मनोरंजन करतात. येथे आपल्याला कॉमेडी, इंफोर्मेटीव्ह आणि बरेच क्राफ्ट व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. आपण अनेक वेळा स्टंट करतानाचे व्हिडीओ पाहिलं असेल. मात्र खऱ्या आयुष्यातही काही तरुण असे अनेक स्टंट करतात, जे पाहून आपल्या अंगावर काटा उभा राहतो. तर बरेच लोक असे देखील असतात, जे स्टंट करायला जातात खरं, परंतु त्यांच्यासोबत असं काहीसं घडतं, ज्याचा आपण विचार देखील करु शकत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही घाम फुटला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण एका खोल दरीच्या कठड्यावर उभा आहे. ही दरी खूप खोल असल्याचं व्हिडाओमध्ये दिसत असून हा तरुण अगदी छोट्याशा कठड्यावर बॅक प्लिप करण्याचा प्रयत्न करत आहे. हा स्टंट करताना तरुण उलटी उडी मारतो आणि अचानक त्याचा पाय सरकरतो अन् तरुण हजारो फूट दरीत कोसळतो. एक छोटीशी चूक या तरुणाच्या जीवावर बेतली आणि तरुण जीवानीशी गेला. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – धक्कादायक! ‘प्ले ग्रुप’च्या त्या मुलांमध्ये वागण्यात बदल, CCTV video त क्रूर वागणूक कैद…
कोणत्याही सुरक्षेशिवाय वतरुण अशा प्रकारे उडी मारताना पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.