जेवण करण्याचा कंटाळा आलाय किंवा तेच तेच पदार्थ नको म्हणून आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी मॅगीवर एखाद्या दिवशीचं रात्रीचं किंवा दुपारचं जेवण नक्कीच केलं असणार. मात्र याच मॅगीमुळे आयुष्य बदलून टाकणाऱ्या एका निर्णयापर्यंत एक जोडपं पोहचलंय असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. एका व्यक्तीने त्याची पत्नी त्याला दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात रोज मॅगीच खायला देते म्हणून चक्क घटस्फोटाचा अर्ज केला आणि नंतर तो मंजूरही झाला. तुम्हाला हे वाचून गंमत वाटली असेल मात्र खरोखर असा प्रकार घडलाय कर्नाटकमध्ये!
नक्की वाचा >> सिगारेट सोडल्याने एवढे पैसे वाचले की त्यामधून साकारलं मोठ्या घराचं स्वप्न; केरळच्या आजोबांची गोष्ट
मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एल. रघुनाथ यांनी एका भाषणामध्ये बोलताना या प्रकरणाचा उल्लेख केला. जोडप्यांमध्ये होणारी भांडण जेव्हा थेट न्यायालयापर्यंत येतात तेव्हा काय घडतं या विषयावर भाष्य करत असतानाच रघुनाथ यांनी बेल्लारीमधील जिल्हा न्यायालयामध्ये न्यायमूर्ती असताना त्यांच्याकडे सुनावणीसाठी हे विचित्र प्रकरण आलं होतं, असं सांगितलं.
या प्रकरणाबद्दल बोलताना रघुनाथ यांनी, “याचिकाकर्त्या नवऱ्याने पत्नीला मॅगी सोडून इतर पदार्थ बनवण्यासंदर्भात ज्ञान नसल्याचा दावा केला. माझी पत्नी सकाळी नाश्त्याला, दुपारच्या जेवणाला आणि रात्रीच्या जेवणालाही मॅगी नूडल्सच करते, असं त्याने सांगितलं. माझी पत्नी किराणावाल्याकडून केवळ मॅगीच घेऊन येते, असंही त्याने आपली बाजू मांडताना म्हटलेलं,” अशी आठवण सांगितली. रघुनाथ यांनी या प्रकरणाला मजेने ‘मॅगी केस’ असं नाव दिल्याचंही सांगितलं. नंतर परस्पर संमतीने या दोघांनी घटस्फोट घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. शुक्रवारी मैसूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात रघुनाथ यांनी या प्रकरणासंदर्भात सांगितल्याचं वृत्त द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलंय.
नक्की वाचा >> पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवल्यानंतर दहाव्या मिनिटाला मेमरी लॉस; डॉक्टरांनी शोधून काढलं या स्मृतीभ्रंशांचं कारण
वैवाहिक वाद सोडवणं फार कठीण असतं असंही रघुनाथ यांनी सांगितलं. अनेकदा मुलांच्या भवितव्याचा विचार करुन जोडपी एकत्र राहण्यासाठी होकार देतात असंही त्यांनी यावेळी म्हटलं. “जोडप्यांनी थोडं समजून घ्यावं म्हणून आम्ही भावनिक आवाहन करुन त्यांना एकत्र आणतो. अशी प्रकरण ही मानसिक दृष्टीकोनातून अधिक विचार करायला भाग पाडणारी असता. अनेक प्रकरणांमध्ये जोडपी एकत्र राहतात मात्र त्यांच्यातील वादाही कायम असतात. ८०० ते ९०० प्रकरणांपैकी आम्हाला केवळ २० ते ३० प्रकरणांमध्ये यश येतं. मागील एका लोक अदालतमध्ये ११० घटस्फोटांच्या प्रकरणांपैकी केवळ ३२ प्रकरणांमध्ये जोडप्यांनी समजून घेत लग्न टिकवलं,” असं रघुनाथ म्हणाले.
नक्की पाहा >> शिखर धवनला वडिलांकडून मारहाण, आधी कानाखाली मारली मग लाथा बुक्क्यांनी मारहाण केली; Viral झाला घरातील ‘तो’ Video
मागील काही वर्षांमध्ये घटस्फोटांच्या प्रकरणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीय. घटस्फोटासाठी अर्ज करण्याआधी जोडप्यांनी किमान एक वर्ष तरी एकत्र रहायला हवं. असा कायदा नसता तर थेट लग्नाच्या हॉलमधून घटस्फोटाचे खटल्यांसाठी अर्ज करण्यात आले असते,” असंही रघुनाथ म्हणाले.
नक्की वाचा >> ‘How To Murder Your Husband’ निबंधाची लेखिका पतीच्या हत्येप्रकरणात दोषी; ११ न्यायाधिशांनी ८ तासांच्या चर्चेनंतर सुनावली शिक्षा
अनेक विचित्र कारणांसाठी घटस्फोटाचे अर्ज केले जातात असंही रघुनाथ यांनी सांगितलं. जोडीदार बोलत नाही, जेवण वाढताना चुकीच्या बाजूने मीठ वाढलं, चुकीच्या रंगाचा लग्नाचा सूट शीवला, फिरायला घेऊन जात नाही अशी अनेक वेगवेगळी कारणं घटस्फोट घेण्यासाठी सांगितली जातात, असं न्यायमुर्तींनी सांगितलं.
“ग्रामीण भागापेक्षा शहरी भागांमधून घटस्फोटासाठीचे अधिक अर्ज येतात. ग्रामीण भागांमध्ये गावातील पंचायत दोघांमधील वाद मिटवते. तिथे महिलांना जास्त स्वातंत्र्य नसतं. समाजाची भीती आणि कौटुंबिक भावनांमुळे ती परिस्थितीशी जुळवून घेते. मात्र शहरांमध्ये महिला या शिकलेल्या आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असतात,” असं रघुनाथ म्हणाले.