कावळा या पक्ष्याला हिंदू संस्कृतीमध्ये फार महत्त्व आहे. पिंडाला कावळ्याचा स्पर्श होण्यासाठी आतुरतने वाट पाहिली जाते. कावाळ्यांचा कर्कश आवाज आपल्या सवयीचा झाला आहे. शहर असो किंवा गाव कावळा हा पक्षी नेहमी पहायला मिळतो. कावळ्यांचे मजेशीर व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात पण सध्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो चक्क कावळ्याचा आवाज काढतो. एवढचं नाही तर त्याचा आवाज ऐकताच कावळेही उडत येतात.
लोकांमध्ये कौशल्याची कमतरता नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये एका पेक्षा एक कौशल्य पाहायला मिळतात आहेत. एका व्यक्तीचे कावळ्याचा आवाज काढण्याचे कौशल्या सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. व्हिडिओमध्ये एका मोकळ्या मैदानात उभा असलेला एक माणूस कॅप्चर करतो, जो आत्मविश्वासाने कावळ्यांच्या वेगळ्या आवाजाची हुबेहुब नक्कल करून दाखवतो.आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याची हाक ऐकताच कावळ्यांचे थवे आकाशात उडताना दिसतात आणि बघता बघता ते संपूर्ण आकाश व्यापून टाकतात. व्यक्तीची कावळ्यांशी संवाद साधण्याची विलक्षण क्षमता पाहून लोक थक्क झाले आहेत. सोशल मीडियावर विविध प्राण्यांच्या आवाजाची नक्कर करताना अनेकांना पाहिले असेल पण या व्हिडीओला कोणी टक्कर देऊ शकणार नाही.
हेही वाचा – ‘हसरे डोळे अन् लोभस हसू!’ रामलल्लांचे जिवंत रूप पाहून भारावले भक्त; प्रभू रामाच्या मुर्तीचा AI Video Viral
निरभ्र निळ्या आकाशाचे अचानक कावळ्यांची शाळा भरल्याचे चित्तथरारक दृश्य पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहे. व्हिडीओमध्ये त्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांसाठी खरोखरच हा एक विस्मरणीय क्षण आहे. इंस्टाग्रामवर vibes_kalyug नावाच्या अकांऊटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अनेक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहे एकाने कमेंट केली की, “याला एकता म्हणतात; आपण माणसांनी यापासून शिकले पाहिजे. सर्व कावळे अचानक येण्याचे कारण म्हणजे त्यांना वाटले की काही कावळे धोक्यात आहेत आणि मदतीसाठी विचारत आहेत. असो, त्या व्यक्तीने चांगली नक्कल केली.” दुसर्याने विनोदीपणे सुचवले की, “मार्वलला त्यांचे नवीन पात्र, ‘क्रो-मॅन'(Crow-Man) मिळाले,” मनुष्याच्या कौशल्याचे कौतूक करताना तिसरा म्हणाला, “ही पुढची पातळी आहे,” तर चौथ्याने सरळ म्हटले, “हे खूप छान आहे.” व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, ज्यामुळे व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत