पुण्यातील एका रेस्टॉरंटमधून झोमॅटोद्वारे ऑर्डर केलेल्या पनीर बिर्याणीच्या प्लेटमध्ये चिकनचा तुकडा सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्यक्तीच्या “धार्मिक भावना दुखावल्याच्यचे ग्राहकाने तक्रार करत सांगितले. पंकज शुक्ला नावच्या खात्यावरून X (पूर्वीचे ट्विटर)वर ही पोस्ट शेअर करण्यात आली. पोस्टमध्ये त्याने चिकनचा तुकडा दिसत असल्याचा फोटो शेअर केला आहे. झोमॅटोने या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्या पोस्टमध्ये पंकजने सांगितले की, त्यांनी पुण्यातील कर्वे नगर येथील पीके बिर्याणी हाऊसमधून पनीर बिर्याणीची ऑर्डर दिली. पंकज पुढे म्हणाले की, जरी झोमॅटोने आपण दिलेली रक्कम परत केली असली तरीही त्याने पुढे जाऊन या घटनेबद्दल ऑनलाइन लिहिण्याचा निर्णय घेतला.

quickly make delicious egg cutlets Read materials and actions
व्हेज कटलेट खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा अंड्याचे स्वादिष्ट कटलेट; वाचा साहित्य आणि कृती
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Lauki ke creamy kofta in Marathi dudhi kofta recipe in marathi veg kofta recipe in marathi
दुधी खाताना घरचे नाक मुरडतात ? बनवा झणझणीत दुधी कोफ्ता; ही रेसिपी बनवाल तर दोन पोळ्या जास्तच खाल
Sago French Fries
चटपटीत खावंसं वाटतंय? मग बनवा साबुदाणा फ्रेंच फ्राईज; ही घ्या सोपी रेसिपी…
tula shikvin changalach dhada charulata is the real bhuvneshwari
चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar This scene was challenging
‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरसाठी ‘हे’ सीन होते आव्हानात्मक, म्हणाली, “अनिरुद्ध अरुंधतीला हाताला धरून…”
Aai kuthe kay karte fame madhurani prabhulakar got emotional sharing her old memories of the serial
‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, मधुराणी प्रभुलकर झाली भावुक; म्हणाली, “प्रत्येक स्त्रीचा आरसा असणारी भूमिका…”
margherita pizza name connection with queen margherita do you know
मार्गेरिटा पिझ्झाच्या नावाचं इटलीच्या राणीशी आहे खास कनेक्शन, वाचा १३५ वर्षांपूर्वीची रंजक गोष्ट

“पीके बिर्याणी हाऊस कर्वे नगर पुणे महाराष्ट्र वरून पनीर बिर्याणी मागवली आणि मला त्यात चिकनचा तुकडा सापडला. (मी शाकाहारी आहे) मला आधीच पैसे परद देण्यात आले आहे पण मी धार्मिक व्यक्ती असल्याने माझ्यासाठी हे पाप आहे आणि त्यामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, पंकजने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

झोमॅटोच्या अधिकृत ग्राहक सेवा खात्याने पंकजच्या पोस्टला प्रतिसाद दिला आणि त्यांना सविस्तर माहिती शेअर करण्यास सांगितले जेणेकरुन पुढील तपास करता येईल.

“हाय पंकज, आम्ही कोणाच्याही भावनांशी कधीही तडजोड करणार नाही याची खात्री करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. कृपया तुमचा ऑर्डर आयडी किंवा नोंदणीकृत फोन नंबर DM द्वारे सामायिक करा जेणेकरून आम्ही हे तपासू शकू,” Zomato ने सांगितले.

हेही वाचा – श्रीदेवीप्रमाणे साडी नेसून बॉलीवूड गाण्यावर महिलेने केला डान्स, लेकाने पूर्ण केले आईचे स्वप्न! पाहा Viral Video

एक्सवर पंकजची पोस्ट १७,००० हून अधिक लोकांनी पाहिली असून आता वेगात व्हायरल होत आहे. दरम्यान, झोमॅटोने मार्चमध्ये १००टक्के शाकाहारी आहाराला प्राधान्य असलेल्या ग्राहकांसाठी ‘प्युअर व्हेज मोड’ आणि ‘प्युअर व्हेज फ्लीट’ लॉन्च करण्याची घोषणा केल्यानंतर त्याचे सीईओ दीपंदर गोयल यांनी मार्चमध्ये नव्या वादात अडकले.

हेही वाचा – उन्हाळ्यात बर्फ टाकून मळा कणीक! पाहा काय होईल कमाल, Kitchen Jugaad एकदा वापरून बघा

सोशल मीडियाच्या अनेकांनी झोमॅटोच्या नवीन ‘प्युअर व्हेज मोड’ला “जातीवादी” असे लेबल दिले होते, जरी गोयल यांनी यावर जोर दिला की ते “कोणत्याही धार्मिक, किंवा राजकीय प्राधान्यांची सेवा देत नाही”