कोणाचं नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही. अनेक जणांना याचा अनुभव आलाही असेल. एखाद्या अनपेक्षित घटनेने त्यांचे नशीब पालटले आपण पहिले असेल. अमेरिकेतील अशाच एका व्यक्तीचे नशीब बदलले आहे. एका हॉटेलमध्ये जेवण करताना घासामध्ये मोती आला. त्या मोतीची किंमत चक्क दोन लाख ५० हजार रूपये आहे.
त्या नशीबवाण व्यक्तीचे नाव रिक अॅन्टॉश (Rick Antosh) असे आहे. आपल्या मित्रांसोबत Oyster Bar मध्ये जेवणासाठी गेले होते. Oyster Bar इथे केवळ शिंपल्यापासून तयार केलेलेच पदार्थ मिळतात. जेवताना रिक यांच्या तोंडातून काहीतरी दगडासारखी विचित्र गोष्ट बाहेर आली. त्यानंतर रिक यांनी हॉटेलच्या मॅनेजरला याबाबत तक्रार केली. त्यावेळी मॅनेजरने रिक यांची माफी मागत असे यापूर्वी कधीच झाले नसल्याचे सांगितले.
त्यानंतर रिक यांनी जेवणामध्ये मिळालेला मोती जपून ठेवला. आणि नंतर त्याची किंमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्या मोतीची किंमत ऐकून त्यांनाही धक्का बसला. दुकानदाराने त्या मोतीची किंमत दोन ते चार हजार डॉलर असल्याचे सांगितले. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत एक लाख ५० हजार ते दोन लाख ८४ हजार इतकी होते प्रसारमाध्यमांशी बोलताना रिक म्हणाले की, आयुष्यातील हे अप्रतिम जेवण होते. त्यामुळे मी कोट्यधीश झालो.