अनेक सोशल मीडियावर साहसी व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियाच्या या जमान्यात लोक प्रसिद्ध होण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. काही लोक काही पराक्रम करून प्रसिद्ध होतात तर काही लोक त्यांच्या कौशल्यामुळे लोकांच्या नजरेत येतात. अशीच एक व्यक्ती आपल्या कौशल्यामुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. कारण तो हवेत स्कूटर उडवत होता. होय, सुरुवातीला तुमचा विश्वास बसणार नाही कारण चित्रपटांमध्ये असे घडते. पण पाहिलं तर हे खरंच घडलं आहे, या व्यक्तीने स्कूटरवर बसून पॅराग्लायडिंग केलं आणि लोक हा पराक्रम बघतच राहिले.
हे रोमांचकारी साहस हिमाचल प्रदेशमध्ये घडले आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका तरुणानं स्कूटरवर बसून पॅराग्लायडिंगसाठी हवेत उड्डाण केले आणि हे उड्डाण यशस्वीही झाले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये स्कूटरवर बसलेल्या या व्यक्तीला हवेत उडताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले. अनेकांनी या पॅराग्लायडरचा संपूर्ण व्हिडिओ बनवला जो इंटरनेटवर येताच व्हायरल झाला. हिमाचल प्रदेशातील बंदला धारमध्ये हे साहस करण्यात आले. हर्ष असे हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> सोशल मीडियाची कमाल! बाईक चोरीला गेली; मालकानं फेसबूकला शेअर केली अशी पोस्ट २ दिवसांत बाईक मिळाली परत
स्कूटरमधून बॅटरी काढली
हर्ष हा प्रशिक्षित पॅराग्लायडर आहे. आणि तो बऱ्याच दिवसांपासून यामध्ये काहीतरी वेगळे करण्याचा विचार करत होता. हर्ष हा पंजाबचा असून हे काम पूर्ण करण्याच्या एकमेव उद्देशाने तो बंदला धार येथे आला होता. त्याने आपली इलेक्ट्रॉनिक स्कूटर पॅराग्लायडरला बांधली आणि स्कूटरवर बसून हवेत उड्डाण केले. पॅराग्लायडर ठराविक वजनानेच उडू शकत असल्याने हर्षने स्कूटरमधून बॅटरी काढली होती.
काही जण सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्यासाठी भन्नाट स्टंटबाजी करण्याच्या उत्साहात स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. या तरुणानेही धोका पत्करून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.