Rare Fish Found In Pacific Ocean Video Viral : अमेरिकेतील सॅन डियागो शहरातील एका व्यक्तीने पॅसिपिक महासागरात सर्फिंगसाठी फेरफटका मारला. जगातील सर्वात मोठ्या पॅसिपिक महासागरात जाऊन सर्फिंग करणं खूप अवघड असतं. पण ज्या लोकांमध्ये सर्फिंग करण्याचं कौशल्य असतं, ते या महासागरात जाऊन व्हिडीओच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करत असतात. पण या महासागरात सर्फिंगला गेलेल्या तरुणाला एक दुर्मिळ मासा सापडल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या माशाचा जबरदस्त व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. माशाचा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत.
सॅन डियागो येथील स्थानिक फोटोग्राफर एड हर्टेल यांनी एका माध्यमांशी बोलताना दुर्मिळ माशाबद्दल माहिती दिली. हा सील मासा असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हर्टेल म्हणाला, सील मासे पाण्याच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात आणि सर्फबोर्डवर चढतात. पाण्यात उडी मारण्याआधी तो सील मासा पाच ते दहा मिनिटे सर्फबोर्डवर बसला होता. जर तुम्ही हा व्हिडीओ बारकाईने पाहिला तर तुम्हाला माहित होईल की, सील मासा माणसांना घाबरत नाही.
इथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला असून यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सील माशाचा व्हिडीओ खूप सुंदर असल्याचं काही यूजर्सचं म्हणणं आहे. एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, शार्क माशाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी सील मासा सर्फबोर्डवर चढण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडीओला जबरदस्त प्रतिक्रिया मिळत असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.