कि-बोर्डवर टाईप करताना आपण बोटांचा वापर करतो. काही जणांचा किबोर्डवर एवढा हात बसला असतो की अगदी यंत्रासारखे पटापट शब्द ते टाईप करतात. याला काही अपवादही आहेत. शारिरिक व्यंग किंवा हात गमावल्याने पायांच्या बोटांचा वापर करूनही टाईप करणारे तुम्ही पाहिले असतील. पण नाकाने टाईप करणारा यापूर्वी तुम्ही कधीच पाहिला नसेल. आता तुम्ही म्हणाल नाकाने टाईप करुन तो पटापट टाईप थोडीच करणार! पण तुमचा हा समज पूर्णपणे फोल ठरेल जेव्हा तुम्ही मोहम्मद खुर्शीद हुसैनला टाईप करताना पाहाल.

वाचा : स्मरणशक्तीच्या जोरावर भारतीय मुलीने केला विश्वविक्रम

वाचा : कावळ्याच्या वक्रदृष्टीने कर्नाटकचे मुख्यमंत्री पुन्हा झाले अस्वस्थ

हैदराबादचा रहिवाशी असलेला मोहम्मद खुर्शीद हुसैन हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. तो हाताच्या बोटांनी नाही तर चक्क नाकाने टाइप करतो. त्याचा वेग इतका आहे की फक्त ४७ सेकंदात तो १०३ शब्द नाकाने टाईप करू शकतो. यावरून तुम्ही त्याच्या वेगाची कल्पना करु शकता. पण नाकाने टाईप करताना त्याला अनेक समस्यांना समोरे जावे लागते. कारण नाकाने टाईप करताना त्याला दिसत नाही. १० वर्षांचा असल्यापासून मोहम्मद याचा सराव करत आहे त्यामुळे तो नाकाने टाईप करु शकतो. दरदिवशी आठ तास नाकाने टाईप करण्याचा सराव तो करतो. त्यामुळे त्याच्या नावे विश्वविक्रम देखील आहे. नाकाने जलद टाईप करणारा टायपिस्ट म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याच्या नावाची नोंद आहे.

वाचा : ऐकावे ते नवलच! २०१७ मध्ये निघालेले विमान २०१६ ला पोहोचले

Story img Loader