बासरी हे भगवान श्रीकृष्णचं वाद्य. श्रीकृष्णाच्या बासरीमधून निघणारे सुमधूर स्वर कानावर पडले की राधासह इतर गोपिकादेखील मंत्रमुग्ध होऊन जायच्या. सारं गोकुळ कृष्णाच्या बासरीतून निघणाऱ्या स्वरांनी तल्लीन व्हायचं. अशा अनेक कथा आपण ऐकल्या असतील. त्यामुळे फार पुरातन काळापासून बासरी वाद्याविषयी आपल्याला वेगळीच ओढ आहे. हरिप्रसाद चौरसिया, पन्नालाल घोष, भोलानाथ प्रसन्न यांसारख्या अनेक दिग्गजांनी बासरीला एक वेगळीच उंची गाठून दिली. बासरी वादनात हातखंडा असलेलं आणखी एक नाव सध्या हळूहळू चर्चेत येत आहे.
Viral Video : दिलखेचक अदा आणि दमदार नृत्याने दोघींनी केलं नेटकऱ्यांना घायाळ
हेमंत थापा असं या बासरी वादकाचं नाव असून, ते सिक्कीममध्ये राहतात. ते तोंडाने नाही तर नाकानं बारसी वाजवतात. एका नाकपुडीत कापसाचा बोळा तर दुसऱ्या नाकपुडीजवळ बासरी धरून ती लीलया वाजवताना हेमंत यांना पाहणं ही वेगळीच पर्वणी असते. त्यांना बासरी वाजवताना पाहणं आणि ऐकणं या दोन्ही गोष्टी श्रोत्यांना एक वेगळाचं आनंद देऊन जातात. हेमंत शाळेत असल्यापासून बासरी वाजवत आहेत, बासरी ही तोंडाऐवजी नाकानं वाजवता येऊ शकते का? असा प्रश्न त्यांना शाळेत असताना पडला. त्यांनी प्रयोग म्हणून नाकानं बासरी वाजविण्याचा प्रयत्न केला आणि यात त्यांना यशही आलं.
Viral Video : धक्कादायक! ‘हा’ व्हिडिओ पाहून विकृत माणसाची तुम्हाला चीड येईल
तेव्हापासून हेमंत नाकानं बासरी वाजवत आहेत. या कलेत ते निपुण असले तरी यासाठी दररोज तीन ते चार तासांची मेहनत त्यांना करावी लागते, असंही ते ‘एएनआय’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. हेमंत लहान गावातून आलेले कलाकार आहेत पण ही कला लोकांनी पाहावी, तिच्याबद्दल त्यांच्याही मनात तितकाच आदर निर्माण व्हावा एवढंच हेमंत यांचं स्वप्न आहे.