एका असाध्य रोगाने त्याच्या पत्नीला अवघ्या ४९ व्या वर्षीच जगाचा निरोप घ्यावा लागला. मात्र त्याचे पत्नीवर असणारे प्रेम शब्दांत सांगता न येण्यासारखे…वैद्यकीय आणि संशोधन क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. एखाद्या नवीन उपचारपद्धतीचा शोध लागेल आणि आपली पत्नी पुन्हा जिवंत होईल, अशी भाबडी आशा तिच्या पतीला आहे. त्यासाठी त्याने आपल्या पत्नीचा मृतदेह प्रयोगशाळेत ठेवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चीनमधील झान वेनलिआन या महिलेचा मृतदेह ३ महिन्यांपासून प्रयोगशाळेत ठेवण्यात आला आहे. १९६ डिग्री सेल्सियसमध्ये नायट्रोजनच्या द्रवात हा मृतदेह ठेवण्यात आला आहे. पत्नीचा मृत्यू झाला नसून ती झोपली आहे. ती आराम करत आहे, असे तिचा पती गुई जुनमिन याला वाटते. तिचा मृत्यू झाला आहे यावर त्याचा विश्वासच बसत नाही. ती मला सोडून गेली आहे हे मी सहनच करू शकत नाही. तिचा मृत्यू झाल्याचे मला तरी वाटत नाही. ती काही वेळासाठी आराम करत आहे, असे तो सांगतो.

तिचा मृतदेह प्रयोगशाळेत ठेवण्याचा केवळ मलाच फायदा होणार नाही तर वैद्यकीय तंत्रज्ञानाचा विकास होण्यासाठीही उपयोग होईल. तिचा मृतदेह प्रयोगशाळेत ठेवण्याची परवानगी मी तिच्याकडूनच घेतली होती, असेही त्याने सांगितले. यीनफेंग बायोलॉजिकल ग्रुपच्या प्रयोगशाळेत तिचा मृतदेह ठेवण्यात आला आहे. तेथील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या देहातील रक्तात इंजेक्शनद्वारे थिनर आणि अॅंटीऑक्सिडंट्स देण्यात आले आहे. झान हिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केल्यानंतर दोन मिनिटांच्या आतच तिचे रक्त गोठू नये, यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. तसेच शरीर थंड राहावे यासाठी तिच्या शरीरात मीठ असलेले थंड पाणीही सोडण्यात आले. याशिवाय रक्तप्रवाह आणि श्वसनक्रिया सुरू राहावी, यासाठीही तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मृत्यू झाल्यानंतर अवघ्या १३ मिनिटांमध्ये झान हिचा मृतदेह प्रयोगशाळेत आणण्यात आला होता. त्यानंतर सर्व रासायनिक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ही चीनमधील पहिलीच घटना आहे. दरम्यान, विज्ञानविषयक लेखक डू हाँग यांचे अवयवही अशाच पद्धतीने गोठवून ठेवण्यात आले होते.