आयुष्यात एकदातरी आलिशान हॉटेलमध्य खाणं, पिणं, मौज मज्जा करता यावी असं अनेकांचं स्वप्न असतं. दिमतीला नोकर चाकर, हॉटेलच्या मुलायम गादीवर गाढ झोप, स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा मनमुराद आनंद एकादा तरी घ्यावा अशी इच्छाही असते. पण आपण किती कल्पनेचे मनोरे रचले तरी या सर्व गोष्टीसाठी मोठी किंमत तर चुकवावी लागणारच ना! या गोष्टी फुकटात थोडेच येणार म्हणा.. पण चीनमधल्या एका माणसाला मात्र याची वेगळ्याच प्रकारे ‘किंमत’ चुकवावी लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Viral Video : वर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

हा माणूस एका हॉटेलमध्ये राहत होता, हॉटेलमधील वास्तव्याच्या काळात हॉटेलने भलंमोठं मोठं बिल त्याच्या हातात थोपवलं, बिलाचा आकडा पाहून त्याला घामच फुटला. बिलाची रक्कम चुकती करण्याएवढे पैसे त्याच्याजवळ नव्हते. तेव्हा त्याने हॉटेलमधून पळ काढण्याचा पर्याय स्वीकारला. पण, पलायनाचा प्रयत्न त्याचा पुरता फसला आणि हे प्रकरण त्याच्या चांगलंच अंगाशी आलं. तो १९ व्या मजल्यावरून शेजारच्या इमारतीत उडी मारण्याचा प्रयत्न करत होता पण या नादात त्याचा तोल गेला आणि दोन्ही बिल्डिंगला जोडणाऱ्या केबल वायरमध्ये तो अडकला. काही काळ गुंत्यात अडकून पडल्यावर त्याचा सुटकेसाठी प्रयत्न सुरू झाला. पण आपली सुटका करून घेण्यास काही त्याला यश आलं नाही. शेवटी अग्निशमन दलाने या माणसाला वाचवलं. काही काळानंतर पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले. दरम्यान त्याने केलेल्या स्टंटचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

वाचा : हार्दिक पांड्यासोबतच्या ‘मिस्ट्री गर्ल’चं कोडं उलगडलं, पांड्याने केला नात्याचा खुलासा