देशभरात कोविड-१९ पासून बचाव करण्यासाठी लसीकरण करून घेणे किती महत्त्वाचे आहे हे आता सगळ्यांनाच समजले आहे. यामुळे आता प्रत्येकजण लस मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक राज्यात गेल्या काही दिवसांपासून लसींचा तुटवडा दिसून येत आहे. याच कारणामुळे लोक जमेल त्या मार्गाने कधी ओळख काढून तर कधी अन्य शक्कल लढवत लस मिळवण्यासाठी धडपडत आहे. दरम्यान लसीकरणाचा एक भन्नाट व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने चक्क बाजूच्या खिडकीतून लस घेतल्याचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर कमेंटसही केल्या आहेत.
काय आहे व्हिडीओमध्ये?
फेसबुकवर तरुण त्यागी या फेसबुक युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. शेअर केलेला व्हिडीओ निव्वळ १५ सेकंदांचा आहे. “आपसदारी” और “सैटिंग” तो हमारे देश की शान हैं..” अशी कॅप्शन देत अ व्हिडीओ शेअर केला आहे. यात दिसून येत की एक माणूस बाजूला जाऊन दोन भिंतीवर थोडसं चढून खिडकीत जातो. आणि खिडकीतून एक जण त्याला लस टोचताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शेवटच्या काही सेकंदामध्ये लसीकरणासाठी किती मोठी रांग आहे हे दिसून येत आहे.
नेटीझन्सच्या भन्नाट प्रतिकिया
या व्हिडीओला आत्तापर्यंत ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर ५,००० पेक्षा जास्त वेळा हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. व्हिडीओ नक्की कुठला आहे हे स्पष्ट नसले तरी, काहींनी हा व्हिडीओ बिहारमधील असल्याचं म्हटलं आहे. व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाल्यावर नेटिझन्समध्ये यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींना ही घटना मनोरंजक वाटली, तर काहींनी असे लिहिले की अशा मार्गांनी लसीकरण करणे असुरक्षित आहे. एक युजर कमेंट करतो की, “काय सेटिंग लावली आहे यांनी” दुसरा युजर म्हणतो की, “पाठच्या दरवाजाने सर्व्हिस” तिसरा युजर आपल्या एका मित्राला टॅग करत बोलतो की, “बघ मित्रा आपली अशी ओळख असती तर आपल्याला कधीच रांगेत उभं राहावं लागलं नसत”
तुम्हाला काय वाटत या व्हिडीओबद्दल?