Man Surprises Female Worker On Petrol Pump : एखाद्या व्यक्तीला त्याच्या कामाची पोचपावती मिळाल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील भाव अनमोल असतात. एका दुचाकीस्वाराने पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला एक भन्नाट गिफ्ट दिलं. त्या तरुणीला हे खास गिफ्ट देण्यामागचं कारणंही विशेष आहे. पेट्रोल पंपावर अनेक वाहनांच्या रांहाच रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी तरुण मुलं पेट्रोल पंपावर काम करत असल्याचे पाहायला मिळतात. मात्र, एका पेट्रोल पंपावर तळपत्या उन्हात एका तरुणीने जबाबदारीचं भान ठेवून वाहनांमध्ये पेट्रोल भरण्याचं काम सुरु ठेवलं.

भर उन्हात ही महिला कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत असल्याचं पाहून एका व्यक्तीला तिच्या कामाबद्दल अभिमान वाटला. त्यानंतर त्या तरुणाने तिच्या कामाची पोचपावती म्हणून तिला एक स्पेशल गिफ्ट दिलं. त्यानंतर तरुणीच्या चेहऱ्यावर जे भाव निर्माण झाले, ते पाहून तुम्हालाही मनस्वी आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. द ऑसम आर्ट नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून नेटकऱ्यांनी सुंदर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

नक्की वाचा – सहा वर्षांच्या चिमुकल्यानं जगातील सर्वात मोठ्या विषारी सापाला पकडलं, Video पाहून नेटकऱ्यांचा उडाला थरकाप

इथे पाहा व्हिडीओ

महिला कर्मचारी उन्हात उभं राहून पेट्रोल भरण्याचं काम करते. प्रामाणिकपमे काम करण्याचा तिचा हा उत्तम गुण पाहून एका दुचाकीस्वाराने तिला जबरदस्त गिफ्ट दिलं. त्या तरुणाने एका सफेद कागदावर तिचा स्केच बनवला. हुबेहुब स्केच गिफ्ट म्हणून मिळाल्यावर त्या तरुणीला खूप आनंद झाला. आपल्या कामाची पोचपावती अशा सुंदर पद्धतीने मिळाली, हे पाहून तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. हा जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या तरुणीचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओला एक कोटींहून अधिक व्यूज मिळाले असून २० लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. धर्मेश हादिया नावाच्या तरुणाने या महिला कर्मचाऱ्याला हे खास गिफ्ट दिलं आणि हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला.

Story img Loader