Ram Mandir Tattoo: अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धाटनानंतर देश- विदेशातील राम भक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. २२ जानेवारीला रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. सोहळ्यासाठीही लाखो भाविकांनी अयोध्येत हजेरी लावली होती. पण सोहळा संपला असा तरी या उत्सवाची चर्चा अजूनही सुरु आहे. जिकडे तिकडे श्रीरामाची भक्ती आणि जयघोष सुरु आहे. अशात जे लोक अयोध्येत जाऊ शकले नाही ते आपल्या परिने रामभक्ती करताना दिसत आहेत. त्यांची ही भक्ती पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. सध्या सोशल मीडियावर अशाच एका रामभक्ताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या पूर्ण पाठीवर भगवान राम आणि राम मंदिराचा टॅटू काढला आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, त्या व्यक्तीने पूर्ण पाठभरून भगवान राम आणि राम मंदिराचा टॅटू काढला आहे. वरच्या बाजूला भगवान राम आणि त्याखाली भव्य राम मंदिराचा टॅटू काढले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण त्या व्यक्तीचे कौतुक करत आहेत. तर काही युजर्स पाठीवर भगवान रामाचा टॅटू काढल्यामुळे टीकाही करत आहेत. मात्र टॅटू आर्टिस्टने ज्याप्रकारे हुबेहुब राम मंदिर आणि भगवान रामाचा काढलेला टॅटू पाहून त्याच्या कलेचे काहीजण कौतुक करत आहेत.

“दोन मिनिटं उठून उभी राहा”; अपंग महिलेबरोबर विमानतळ कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन, लोकांचा संताप

@ranjeet_rajak-15 नावाच्या इन्स्टा अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर एका युजरने कमेंट करत लिहिले की, रामाचे भक्त आहात मग भक्ती दाखवण्याचे हे योग्य ठिकाणं नाही. तर आणखी एका युजरने सल्ला देत लिहिले की, जर तुम्हाला देवासाठी काही करायचे असेल तर त्याचे चरित्र आत्मसात करा, फोटो नाहीत.

Story img Loader