शेती करणे हे सोपे काम नाही. आजच्या काळात जेव्हा इतकी महागाई वाढली आहे तेव्हा तर आजिबात नाही. शेतात एखादे रोप घेणे, त्याची चांगली लागवड करणे, त्याला कीड लागू न देणे आणि बाजारात त्याची विक्री करणे ही खूप मोठी प्रक्रिया आहे. शेतकऱ्यांसाठी एका तरुणाने एक हटके कल्पना शोधली आहे. एका तरुणाने असे रोप शोधले आहे ज्यामध्ये एकाच रोपाची लागवड करुण दोन वेगवेगळे भाज्या मिळवू शकतात. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? ही अशक्य वाटणारी गोष्ट एका तरुणाने सत्य करून दाखवली आहे.

एक उत्साही कृषी प्रेमी असलेल्या ॲलेन जोसेफ नावाच्या तरुणाने नव्या रोपाची शेती केली आहे. ज्याला पोमॅटो असे म्हटले जात आहे. या रोपाला एकाच वेळी टोमॅटो आणि बटाटा दोन्ही लागल्याचे दिसते आहे. हे पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या रोपाबाबत माहिती देणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ‘पोमॅटो’चे पाहू शकता. याला कलम करणे असे म्हणतात. दोन रोपांना कलम करून एकत्र जोडले जाते.

हेही वाचा – मैदानावर फुटबॉल खेळाणाऱ्या खेळाडूचा अंगावर वीज पडल्याने झाला मृत्यू; ‘तो’ थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद!

इंस्टाग्रामवर @agrotill या पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओने सर्वांना थक्क केले आहे. आहेत. व्हिडीओमध्ये कृषी प्रेमी ॲलेन जोसेफ ‘पोमॅटो’ ची ओळख करून देतो, जे कलम केलेल रोप आहे ज्यामध्ये बटाटे आणि टोमॅटो एकत्र कलम केले आहेत. हे कल्पक फ्यूजन शेतकऱ्यांना एकाच रोपातून चेरी टोमॅटो आणि पांढरे बटाटे दोन्हीचे उत्पादन देऊ शकते. कलम करणे हा आधुनिक शोध नाही; ही हजारो वर्षांपूर्वीची काल-सन्मानित प्रथा आहे. यात दोन वनस्पतींच्या ऊतींना जोडणे समाविष्ट आहे जेणेकरून ते एकत्र वाढतात.

हेही वाचा – काय सांगता? महिलने चक्क नळाखाली धुतले नान अन् मग खाल्ले, व्हायरल व्हिडिओची चर्चा

व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले तर काहींनी “निसर्गाशी छेडछाड” बद्दल चिंता व्यक्त केली, तर काहींनी असा युक्तिवाद केला की, कलम करणे हा कृषी पद्धतींचा नैसर्गिक विस्तार आहे.

Story img Loader