Man abused a young woman: महिलांचा आदर करा, त्यांना सन्मानाने वागणूक द्या असे संस्कार लहानपणीच अनेकांवर होतात. पण, वर्षानुवर्षे होणाऱ्या अत्याचारावरून काही लोक त्यांचे हे संस्कार विसरलेले दिसतायत. सगळ्याच गोष्टींचं भान विसरून काही लोक आपली मर्यादा ओलांडतात आणि महिलांवर अत्याचार करतात. मग यावेळेस ते कोणाचीही पर्वा करत नाहीत. अगदी निर्लज्जाप्रमाणे सार्वजनिक ठिकाणीदेखील अश्लील कृत्य करायला असे लोक मागेपुढे बघत नाहीत.

सध्या अशीच एक संतापजनक घटना एका मॉलमध्ये घडली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत एका माणसाने भरगर्दीत तरुणीची छेड काढली. नेमकं काय घडलं, ते जाणून घेऊ या…

हेही वाचा… झटक्यात वजन कमी करण्याची निंजा टेक्निक! महिलेने शोधून काढला जगात भारी जुगाड, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल चकित

तरुणीला केला अश्लीलरित्या स्पर्श

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांचा राग अनावर झाला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एका मॉलमध्ये एक माणूस तरुणीची छेड काढताना दिसत आहे. भरगर्दीत हा माणूस तरुणीच्या मागे जाऊन तिला नको त्या ठिकाणी स्पर्श करताना दिसत आहे. दिवसाढवळ्या, सगळ्यांच्या समोर त्याने हे अश्लील कृत्य केलं आहे. भरगर्दीत तरुणीबरोबर असं कृत्य करून तो मोकाटपणे तिथे वावरताना दिसतोय.

विकृत माणसाच्या कृत्याचा हा व्हिडीओ @odia_expore_reels या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल २.७ मिलियन व्ह्यूज आले आहेत. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

हेही वाचा…  VIDEO: कोणाचं घर सोडलं नाही ना कोणतं मंदिर, पती-पत्नीने सगळीकडेच मारला डल्ला! पण शेवटी जे झालं ते पाहून कपाळावर माराल हात

युजर्सच्या संतापजनक प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “त्याची हिंमत कशी झाली असं करायची आणि तो मार न खाताच मॉलच्या बाहेर कसा गेला”, तर दुसऱ्याने “वडिलांच्या वयाचा ना तू… आणि असले कृत्य करतोस” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करत म्हणाला, “कृपया, त्याला तुरुंगात टाका, हा खूप त्रासदायक व्हिडीओ आहे.., मला आशा आहे की त्या मुलीने पोलिसांत तक्रार केली असेल”, असं एक जण कमेंट करत म्हणाला.

Story img Loader