जग बदलतेय तशा आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदलत आहेत. विविध आजारांनी त्रस्त रुग्णांना खाण्याच्या सवयीत पूर्वीपेक्षा खूप बदल झाले आहेत. तर काही जण पूर्वी खात नसलेले अनेक पदार्थ आता आवडीने खात आहेत. त्यामुळे काही झाले तरी जगण्यासाठी पाणी जितके गरजेचे आहे तितकेच अन्न हेदेखील गरजेचे आहे. पण जगात अशी एक व्यक्ती आहे जी अन्न न खाता गेली १७ वर्षे फक्त कोल्ड्रिंग्स पिऊन जिवंत असल्याचा दावा करत आहेत. या दाव्यामुळे आता डॉक्टरही हैराण झाले आहे. या व्यक्तीने दावा केला की, त्याला अजिबात भूक लागत नाही, त्यामुळे तो गेली १७ वर्षे कोल्ड्रिंग्स पिऊन जिवंत आहे. त्याने २००६ पासून जेवणखाण सोडून दिले आहे. त्याच्या दाव्यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘द डेली स्टार’च्या वृत्तानुसार, घोलमरेजा अर्देशिरी असे या व्यक्तीचे नाव असून ते इराणचे रहिवासी आहेत. त्यांनी गेली १७ वर्षे तोंडात अन्नाचा एक कण टाकलेला नाही, संपूर्ण दिवस ते फक्त पेप्सी आणि 7UP पिऊन घालवतात. कोल्ड्रिंक्स पिऊनही ते जिवंत आहेत. शिवाय पूर्णपणे निरोगीदेखील आहेत. ते फक्त चार तासांची झोप घेतात, असा दावाही त्यांनी केला आहे.

फायबर ग्लास दुरुस्तीचे काम करणारे अर्देशिरी सांगतात की, त्यांचे पोट फक्त थंड कोल्ड्रिंक्स पचवू शकते. त्यांनी दुसरे काही खाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना उलट्या होतात. त्यांच्या मते, पेप्सी आणि 7UP सारख्या कार्बोनेटड कोल्ड्रिंक्समधून मिळणारी ऊर्जा त्यांना जिवंत आणि निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी आहे.

Viral video : ये इश्क नही, रिस्क है भैया! कारमध्ये बसल्याचा फील घेत स्कूटीवर करत होते रोमान्स

अर्देशिरी यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरांचाही सल्ला घेतला. त्या वेळी डॉक्टरांनी त्यांना हे सर्व त्यांच्या मनाचे चित्र असल्याचे म्हणत त्यांना कसलीही अडचण नाही असे सांगितले. यावर डॉक्टरांना अर्देशिरी यांनी सांगितले की, जेव्हा जेव्हा ते जेवतात तेव्हा त्यांच्या तोंडात केस गेल्यासारखे वाटते. पण कोल्ड्रिंक्स प्यायल्यानंतर अशी कोणतीही समस्या त्यांना जाणवत नाही.

यावर डॉक्टरांनी अर्देशिरी यांना मानसोपचारतज्ज्ञांना भेटण्याचा सल्ला दिला आहे. पण त्यांना भूक न लागण्याचे कारण काय, हे अद्यापही डॉक्टरांनाही समजू शकलेले नाही. तज्ज्ञांच्या मते, कोल्ड्रिंक्समुळे शरीरात साखरेचे प्रमाण वाढते, ज्यामुळे लठ्ठपणाची समस्या जाणवू लागते. यामुळे कोल्ड्रिंक्सचे सेवन फार कमी करण्याचा सल्ला दिला जातो. तर काही आजारांनी ग्रस्त रुग्णांना कोल्ड्रिंक्स न पिण्याचा सल्ला दिला जातो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man have not eaten food since 17 years alive by drinking only cold drinks shocking claim sjr
Show comments