Viral video: मालमत्तेच्या वादातून होणारी भांडणे ही पिढ्यान् पिढ्या चालूच आहेत. प्रत्येक घरात मालमत्तेवरून नेहमीच भांडणे होत असतात. जमिनीवरून होणारे हे भांडण काही वेळेस खूप गंभीर वळण घेते आणि गोष्ट पार हाणामारीपर्यंत जाते. खासकरून भावाभावांमध्ये भांडणे होण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे. कधी कधी हा वाद इतका टोकाला जातो की, एखाद्याचा जीवही जातो. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. इंचभर जागेवरूनही हे वाद होतानाचे चित्र ग्रामीण भागात दिसते. शेजारी तर सोडा; पण सख्ख्या भावाभावांतही बांधावरून हे वाद झाल्याच्या अनेक घटना आहेत. अशाच मालमत्तेच्या वादाचा एक भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दिल्ली येथील अलीपूर परिसरातील एका व्यक्तीने त्याच्या धाकट्या भावाला कारच्या बोनेटवरून तीन किमीपर्यंत ओढत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबतचा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती कारच्या बोनेटवर लटकत आहे. कार चालवणारा त्याचाच सख्खा भाऊ आहे आणि तो अतिशय वेगात कार चालवत आहे. बोनेटला लटकलेला राजेश मदतीसाठी ओरडत राहिला; मात्र महेशने गाडी थांबवली नाही. वेगात गाडी चालवताना त्याने राजेशला कारमधून खाली पाडून मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. या घटनेमध्ये कारवर लटकत असणारी व्यक्ती जखमी झाली आहे.

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष

हरियाणातील सोनिपत येथील सेक्टर १५ येथील राजेश कुमार, असे जखमी व्यावसायिकाचे नाव आहे. राजेश कुमार यांनी सांगितले की, ते आधी दिल्ली पोलिसांत कार्यरत होते. २०१६ मध्ये सेवानिवृत्तीनंतर त्यांनी औषध व्यवसायास सुरुवात केली. दरम्यान, या प्रकरणी दोघा भावांनी एकमेकांविरोधात तक्रार दिली आहे. राजेशचा भाऊ महेश याच्या तक्रारीवरून अलिपूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच महेशने आपला भाऊ राजेश आणि पुतण्या अंकितने आपला रस्ता अडवल्याचा आरोप केला आहे. पोलिस या प्रकरणी क्रॉस एफआयआर नोंदवून, पुढील कारवाई करीत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: चालत्या कारमध्ये जोडप्याचा ‘रोमान्स’ व्हायरल; एकमेकांना KISS करत…बेभान जोडप्याने ओलांडल्या सर्व मर्यादा

याआधीही भावाभावांमध्ये भांडणे झाल्याचे आपण अनेकदा ऐकले आहे. त्यामध्ये कधी कधी जीवही जातो. त्यापेक्षा एकमेकांना समजून घेतले, तर वाद होणारच नाहीत, अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करीत आहेत.

Story img Loader