एकीकडे ५०० आणि १००० च्या नोटा बंद झाल्यामुळे सर्वसामन्य माणसांची मोठी कोंडी झाली आहे. बँकेतून पैसे बदलून घ्यायचे झालेच तर तीच भलीमोठी रांग. एटीएम सुरू झालेत पण तिथली परिस्थिती  काही वेगळी नाही. थोडक्यात सगळीकडे ‘नोटकल्लोळ’ सुरू झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यातून तर एटीएममधून पैसे काढण्यावरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. अशात पैसे काढायला एखाद्या एटीएममध्ये गेला आणि त्याच्यावर पैशांचा पाऊस पडला तर .? हा चित्रपट किंवा मालिकेतला प्रसंग नाही आहे असा प्रकार खरंच एका तरूणासोबत मलेशियात घडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘लाईव्ह लीक’ या संकेतस्थळावर एका एटीएममधले सीसीटीव्ही फुटेज टाकण्यात आले आहे. एका तरूणाने आपल्या कार्डचा वापर करून पैसे काढले. ठराविक रक्कम काढून निघण्याच्या तयारीत असलेल्या या तरुणासोबत जे काही घडले ते पाहून त्याला हर्षवायू झाला नाही तर नवलच म्हणावे लागेल. पैसे घेऊन झाल्यानंतर बाहेर पडत असतानाच अचानक या मशीनमधून पैशांचा पाऊस सुरू झाला. कितीतरी वेळ मशिनमधून नोटा येणे सुरूच होते. आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री करून घेत या तरुणाने देखील या संधीचा चांगलाच फायदा घेत आपला खिसा भरण्याचे काम केले. जवळपास या मशीनमधून १० हजार मलेशियायी रिंगिट बाहेर आले. मशिनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे असे झाल्याचे समजते आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर तर खूपच व्हायरल झाला आहे. मोदींच्या एका निर्णयामुळे अचानक सगळ्यांनाच पैसे असूनही पैशांची चणचण निर्माण झाली आहे त्यामुळे असा प्रकार आपल्याकडे झाला तर..? अशा कल्पना रंगवून त्यावर अनेक विनोद सोशल मीडियावर रंगत आहेत.

[jwplayer QhQhXyiI-1o30kmL6]