असे म्हणतात की, “मुंबईमधील लोक कधीही झोपत नाही” त्याचप्रमाणे, “बंगळुरुमधील लोक कधीही आपल्या कामातून सुट्टी घेत नाही” असेही म्हणतात. या शहरातील लोक कामामध्ये नेहमी व्यस्त असतात मग भलेही तुम्ही थिएटरमध्ये असो किंवा ट्रॅफिकमध्ये अडलेले असो. असे वाटते की, या शहरातील लोक नेहमी फक्त कामाचा विचार करत असतात. याचे ताजे उदाहरण एका फुटबॉल मॅचमध्ये दिसून आले जेव्हा एक प्रेक्षक हातात पोस्टर घेऊन उभा होता. या व्यक्तीच्या हातातील पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सध्या हे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे पोस्टर २०२३-२४ सीझनमध्ये बंगळुरू एफसी(Bengaluru peak moment) आणि पूर्व बंगालच्या (East Bengal) श्री कांतीरावा स्टेडियम (Sree Kanteerava Stadium in Bengaluru) मध्ये इंडियन सुपर लीग मॅचदरम्यान हे पोस्टर दिसले होते. या मॅचमध्ये सुनील छेत्री (Sunil Chhetri)आणि जावी हर्नांडेज़ (Xavi Hernandez) यांनी स्कोअर केला आणि बंगळुरू एफसीला ईबीएफसी (EBFC)मध्ये २-१ने विजय मिळाला.
हेही वाचा – ‘वय हा फक्त आकाडाच!” १०४ वर्षाच्या आजीने केलं स्काय डायव्हिंग; जागतिक विक्रम मोडण्याचा केला प्रयत्न
लोकांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया
पोस्टर पाहून लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहे. एकाने मजेत म्हटले की, “अॅडमिन स्कॅन करण्याचा प्रयत्न करत होता पण चुकून क्लिक झाले आणि पोस्ट शेअर झाली.” दुसऱ्याने म्हटले की, “फक्त बेरोजगार लोकच मॅच पाहायला येताता असे विचार ते करत असावेत.” तिसऱ्याने सांगितले, “या पोस्टरच्या समोरील भागावर काय लिहिले असेल याचा विचार करा”