आजकाल लोक कामानिमित्त किंवा प्रवासाच्या उद्देशाने दुसऱ्या अनोळखी शहरात प्रवास करतात. अशा वेळी तिथे ओळखीचे कोणी लोक असतील, तर ठीक; नाही तर त्यांना राहण्यासाठी हॉटेलमध्ये रूम बुक केल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे हल्ली प्रत्येक शहर आणि परिसरात तुम्हाला लहान-मोठी हॉटेल्स पाहायला मिळतात. यावेळी प्रत्येक जण त्यांच्या बजेटनुसार हॉटेल रूम बुक करतात. पण, तुम्ही जितक्या कमी बजेटच्या हॉटेलमध्ये रूम बुक करता तितका तुमच्या प्रायव्हसी आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होतो. या कारणास्तव काही लोक आता चांगल्या आणि विश्वासार्ह हॉटेलमध्येच रूम बुक करण्यास प्राधान्य देतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण, अनेक जण अनोळखी शहरात कसलीही माहिती न घेता, चुकीच्या हॉटेलमध्ये रूम बुक करतात. अनेकदा अशा हॉटेलच्या रूममध्ये सीक्रेट कॅमेरे असतात; जे अनेकदा तुमच्या प्रायव्हसीला धोका पोहोचवतात. एवढेच नाही, तर अशी अनेक हॉटेल्सदेखील आढळून आली आहेत; जिथे मानवी तस्करीदेखील सुरु असते.

अलीकडेच एका व्यक्तीने आपल्या हॉटेलच्या रूममध्ये राहण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला; ज्यामध्ये त्याला त्याच्या रूमच्या कपाटात अशा एका खोलीचा गुप्त दरवाजा दिसला. जो खोलताच त्याने जे काही पाहिले, ते खरेच फार धक्कादायक होते.

ही व्यक्ती सुट्या एन्जॉय करण्यासाठी एका अनोळखी ठिकाणी गेली होती. यावेळी ती बुक केलेल्या हॉटेलच्या रूमचे निरीक्षण करीत व्हिडीओ शूट करीत होती. अशा प्रकारे ती व्यक्ती हॉटेलची रूम दाखवल्यानंतर ती वॉश रूमजवळील एका वॉर्डरोबजवळ पोहोचली. वॉर्डरोबचे डिझाईन पाहून ती व्यक्ती गोंधळली. यावेळी वॉर्डरोबच्या मागच्या बाजूला त्याला एक दरवाजाचे हॅण्डल दिसते. त्याने दरवाजा उघडून बघायचे ठरवले. हॅण्डलने दरवाजा उघडताच त्याला धक्काच बसला.

या कपाटाच्या मागे एक अरुंद गल्ली होती. त्या व्यक्तीने आपल्या मोबाइलचा टॉर्च पेटवला आणि तो त्या गल्लीने पुढे जाऊ लागला. कपाटातून ही गल्ली एका गुप्त खोलीकडे जात असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याचा व्हिडीओ त्याने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) शेअर केला आहे. हे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

सहसा लोक हॉटेलच्या रूममध्ये सीक्रेट कॅमेरे आहेत की नाही, असे शोधतात; जेणेकरून त्यांची प्रायव्हसी राखली जाईल. मात्र, आता हॉटेल्समध्ये सीक्रेट रूम्सदेखील बनवल्या जाऊ लागल्या आहेत. एका युजरने लिहिले की, अशा रूममधून ताबडतोब बाहेर पडले पाहिजे. अशा हॉटेलमध्ये रूम बुक करण्याची चूक कोणी करू नये म्हणून अनेकांनी त्या व्यक्तीला हॉटेलचे नाव विचारले.