लोकांना अनेकदा वाटते की त्यांना एकदा तरी बंपर लॉटरी मिळावी आणि ते क्षणार्धात लक्षाधीश व्हावेत. मात्र हे प्रत्येकाच्या नशिबात नसले तरी काही लोकांचे नशीब असे असते की ते क्षणार्धात श्रीमंत होतात. असाच काहीसा प्रकार चीनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडला. त्याच्या नशिबानेही त्याला अशी साथ दिली की तो क्षणार्धात करोडपती झाला, पण ते म्हणतात पैसा मिळाल्यावर माणसं बदलतात, ही व्यक्तीही असाच निघाला. पैसे मिळाल्यावर तोही बदलला आणि त्याला लॉटरी लागल्याचे त्याने आपल्या पत्नीलाही सांगितले नाही. त्यानंतर त्याच्या पत्नीने जे केले ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, दोन वर्षांपूर्वी झोउ नावाच्या व्यक्तीने बंपर लॉटरी जिंकली होती. त्याने १० दशलक्ष युआन म्हणजे १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जिंकली होती. कर कपात केल्यानंतर त्यांच्या खात्यात सुमारे ८ कोटी रुपये आले, मात्र त्यांनी याबाबत पत्नीला काहीही सांगितले नाही. ना त्याने लॉटरीबद्दल काहीही सांगितले ना खात्यातील पैशांबद्दल, म्हणजेच त्याच्या पत्नीला याबद्दल काहीच माहीत नव्हते.

बहीण आणि एक्स पत्नीला पैसे दिले

दरम्यान, झोउने त्याच्या त्याला मिळालेल्या रक्कमेतील २ मिलियन युआन गुप्तपणे त्याच्या बहिणीला दिले, तर ७०,०० युआन त्याच्या माजी पत्नीला फ्लॅट खरेदी करण्यासाठी दिले. जेव्हा त्याच्या पत्नी लिनला कुठूनतरी ही गोष्ट कळली तेव्हा तिने संतापून आपल्या पतीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. तिने लगेच याबाबत कोर्टात केस दाखल केली आणि घटस्फोटाचा अर्जही दाखल केला.

( हे ही वाचा: भारतात ‘हा’ आहे सर्वात लहान रेल्वे मार्ग; अवघ्या ९ मिनिटांत संपतो प्रवास..)

कोर्टात निकाल जाहीर

या खटल्याचा निकाल आला आहे. कोर्टाने झोउ यांना लॉटरी जिंकलेल्या दोन तृतीयांश रक्कम त्यांच्या पत्नी लिनला भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. झोऊने त्याची बहीण आणि माजी पत्नीला दिलेल्या पैशात लिनचा वाटा होता, असेही कोर्टाचे मत होते. कोर्टात गेल्यावर हेही उघड झाले की झोउने जी लॉटरी काढली होती ती लिनच्या पैशानेच खरेदी केली होती, पण बंपर बक्षीस जिंकल्यावर त्याला एकट्याने सगळे पैसे हडप करायचे होते, पण त्याच्या बायकोने त्याचा सगळा खेळ उधळला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man in china hides rs 12 crore lottery win from wife and buys flat for his ex gps