सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, काही हसवणारे असतात काही रडवणारे असतात. तर काही व्हिडीओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाते. काही लोकांना इतरांना त्रास देण्यात काय आनंद मिळतो माहिती नाही, मात्र ते हे नेहमी करत असतात. जाणून बुजून समोरच्याला त्रास देणं त्यांच्या स्वभावातच असतं. काही लोक इतके क्रूर वागतात की अशावेळी त्यांच्या वयाचाही विचार करायला नको वाटतं. अशाच एका वृद्ध व्यक्तीचं भयानक कृत्य समोर आलं आहे. या वृद्धाचा कारनामा पाहून तुम्हालाही संताप येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, व्हीलचेअरवर बसलेल्या वृद्धाने ३० फूट उंचावर असलेल्या एका व्यक्तीला खाली पाडलं. या घटनेत त्याला खूप दुखापत झाली. इतकी की त्याला उठताही येत नव्हतं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वृद्ध व्यक्ती व्हीलचेअरवर जात आहे आणि त्याच दरम्यान तो एका सिडीजवळ थांबतो. मग तो जोरात ही सिडी हलवू लागतो. याचं कारण एवढंच की तो व्यक्ती मध्येच शिडी लावून काम करत आहे. त्यामुळे वृद्धाला राग येतो आणि तो त्याला खाली पाडतो.

ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @crazyclipsonly नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.अवघ्या ३७ सेकंदांचा हा व्हिडिओ ११ मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर ५९ हजारांहून अधिक लोकांनी लाईकही केला आहे. नेटकऱ्यांनी या व्यक्तीवर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – आयुष्यभर ‘फ्री’मध्ये खाऊ शकता ‘Subway’ चं सँडविच; फक्त ‘ही’ एक अट मान्य असेल तर…

जगात खूप वेगवेगळ्या प्रकारची लोकं आहेत, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमधून असे लोक समोर येतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man in wheelchair shakes painters ladder because it is blocking the pavement causing him to fall 30ft to the ground video viral on social media srk
Show comments