सोशल मीडिया हे मनोरंजनाचं प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे इथे तुम्हाला बहुतांश व्हिडीओ असे पाहायला मिळतात. जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.  आजकाल प्रसिद्धीसाठी काहीतरी वेगळं हटके करण्याच्या प्रयत्न युवा पिढी करताना दिसते. यामध्ये अनेक मजेशीर गोष्टीपासून ते धोकादायक स्टंटपर्यंत सर्वकाही केलं जातं. काही मंडळींना स्टंटबाजी कऱण्याची फारच हौस असते. चित्रविचित्र उड्या मारून लोकांना चकित करायला या मंडळींना खूप आवडतं. पण या नादात अनेकदा गंभीर अपघात होतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शेकडो फूट उंचावर तरुणाची स्टंटबाजी –

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये एक व्यक्ती सायकलवर धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. हा व्यक्ती शेकडो फूट उंचीवर उडणाऱ्या पॅराशूटमध्ये सायकलवरुन वेगवेगळे स्टंट करत आहे. चुकुन जरी या व्यक्तीचा तोल गेला तर तो शेकडो फूट उंचीवरून खाली पडण्याची भीती आहे. एवढ्या उंचावरही तो सायकल एखाद्या खेळण्यासारखी उडवत असून निर्भीडपणे स्टंट करत आहे. या व्यक्तीची स्टंटबाजी पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Video viral: तरुणीसोबत चक्क ३ मांजरींनी खेळलं बॅडमिंटन; नेटकरीही झाले अवाक्

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @TheFigen_ नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून नेटकरीही या व्यक्तीचं स्टंट पाहून अवाक् झाले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर अशा धोकादायक स्टंटचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आपण विचारही करु शकत नाही असे भीतीदायक, धोकादायक स्टंट लोक करताना दिसतात. तरुणाचा याकडे जास्त कल असल्याचं पहायला मिळतं.