Funny video: ‘पुणे तिथे काय उणे’ असं पुण्याबाबत नेहमी म्हटलं जातं, याचा प्रत्यय आज आला. पुणे हे जगात प्रसिद्ध शहर आहे. पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. सोशल मीडियावर कधी काय फेमस होईल हे सांगता येत नाही. सोशल मिडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामधील असे काही व्हिडीओ असतात, की ते बघितल्यानंतर आपण हसू आवरू शकत नाहीत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे. पुणेकर, पुणेकारांच्या गोष्टी, त्यांनी केलेले अपमान, त्यांच्या भन्नाट करामती आणि त्यासोबतच त्यांनी केलेले कौतुकास्पद आणि धैर्यवान कार्य याचे किस्से आपण कायमच ऐकतो. पुणेकरांनाचं असल्या भन्नाट कल्पना सुचू शकतात, असंही अनेकजण म्हणतात. मात्र हे तितकंच खरं देखील आहे. पुणेकरांच्या अनेक करामतींची राज्यभर चर्चा होते. अशाच एका करामतीचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल ऐवढा कॉन्फिडन्स येतो तरी कठून…व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये एक कलिंगड विक्रेता आहे. मात्र, या कलिंगड विक्रेत्याची खास कलिंगड विकण्याची पध्दत बघितल्यानंतर कोणीच आपले हसू आवरू शकणार नाही. कलिंगड विक्रेत्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीला रस्त्याच्या कडेला उभं राहून फळं विकत आहे. त्यानं आपल्या गळ्यात कलिंगडाची माळ घातली आहे. डोक्यावर केळीचा घड आहे. कानांवर मोसंबी बांधली आहे. आणि हातामध्ये एक स्पीकर आहे. हा असा अवतार धारण करून तो फळं विकण्याचा प्रयत्न करतोय. या व्हिडीओच्या माध्यमातून नोकरी करणाऱ्या लोकांचं आयुष्य तुलनेत किती चांगलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. कारण दिवसभर हातात फळं घेऊन नाचल्यानंतर तो दोनचारशे रुपये कमावतोय. अशी स्थिती आपली नाहीये. त्यामुळे काम करण्यासाठी यापेक्षा दुसरं मोटिव्हेशन काय पाहिजे? असं व्हिडीओच्या माध्यामातून सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मुंबई लोकलमध्ये “सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची” गाण्यावर महिलांचा भन्नाट डान्स; मकर संक्रांतनिमित्त VIDEO तुफान व्हायरल

व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ७७ हजार लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून बहुतेक युजर्स हसत आहेत. यावर एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की हे भाऊ कच्च्या बदामाचे दुसरे व्हर्जन आहे. त्याचवेळी दुसर्‍या युजर्सने लिहिले की, जर हा माणूस खूप मोठा व्यावसायिक असता तर त्याच्या या शैलीने खूप जास्त मोठा झाला असता.