भारतात दररोज शेकडो रस्ते दुर्घटना होत असतात. त्यातील सर्वाधिक दुर्घटना या नियम न पाळल्याने किंवा स्टंटबाजी करताना झाल्याचे समोर आले आहे; तर काही दुर्घटना किंवा अपघात हे नियंत्रण सुटल्याने झाले आहेत. त्यात अनेक बाइकस्वार नियम पाळत नसल्याने किंवा नियमाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पाहायला मिळते. त्यात शालेय विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशाच एका जीवघेण्या प्रवासाचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे; ज्यात एक व्यक्ती एक वा दोन नाही तर चक्क सात विद्यार्थ्यांना एका स्कूटीवरून बसवून प्रवास करत आहे. या घटनेतून व्यक्ती स्वत:सह मुलांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे दिसते.

एका स्कूटीवरून एकाचवेळी ८ जणांनी केला प्रवास

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती स्कूटीवरून तब्बल सात मुलांना एकत्र घेऊन जात आहे. त्यात स्कूटीच्या मागील बाजूस एक मुलगा उभा आहे आणि तीन मुले मध्यभागी बसली आहेत; तर स्कूटीच्या डाव्या बाजूला एक मूल धोकादायक अवस्थेत लटकले आहे. एवढेच नाही, तर त्या व्यक्तीने हेल्मेटही घातलेले नाही. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

कमाल आहे राव! चक्क बाइकच्या हेडलाइटला बनवले टीव्ही स्क्रीन; देसी जुगाड Video व्हायरल

स्कूटी चालकाचा बेफिकपणा

हा व्हिडीओ @Ayesha86627087 नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे; जो आतापर्यंत ६३ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. युजर्स व्हिडिओवर कमेंट करत संताप व्यक्त करत आहेत. काही लोकांनी तर यांना बेजबाबदार आणि बेफिकीर, असे म्हटले आहे. याआधीही दोनहून अधिक लोक एका बाईकवर बसून जीवघेणा प्रवास करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या संदर्भात वाहतूक पोलिसांकडूनही वेळोवेळी इशारे दिले गेले आहेत. तरीही काही लोक त्यांच्या सवई सोडत नाहीत. या व्हिडिओवर तुमचे मत काय आहे? कमेंट करून जरूर सांगा.

Story img Loader