पॅराग्लायडिंग करताना अंगावर अक्षरश: काटा येतो. पण अनेक एडव्हेंचर करणारे लोक मोठ-मोठ्या पर्वतांवर पॅराग्लायडिंग करण्यासाठी जातात. यावेळी उंचच- उंच पर्वतावर हेलिकॉप्टरमधून ते पॅराशूटच्या मदतीने उडी घेतात. यादरम्यान ते व्हिडीओ आणि फोटोशूटही करुन घेतात. या एडव्हेंचरदरम्यान अनेकदा भीषण अपघातही घडतात. सध्या अशाच एका भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो अंगावर काटा आणणारा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यामध्ये पॅराग्लायडिंग करताना एक व्यक्ती मृत्यूच्या गर्तात फसतो पण त्यानंतरही स्वत:ची कशी सुटका करुन घेतो, याचा थरार दाखवण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पॅराग्लायडिंग करणारा व्यक्ती पॅराशूटच्या मदतीने उंच पर्वतावरून उडी घेतो, यावेळी त्याचे पॅराशूट उघडतच नाही. त्यामुळे तो वाऱ्याच्या वेगाने जमिनीच्या दिशेन पडू लागतो.

पॅराशूट न उघडल्याने जमिनीच्या दिशेने वेगाने जात असतानाच…

या अपघाताचा बळी ठरलेली व्यक्ती पॅराग्लायडर असून केविन फिलिप असे त्याचे नाव आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, केविनने उंच पर्वतावरून उडी मारली पण त्याचे पॅराशूट उघडताच त्याचे दोर एकमेकांमध्ये गुरफटले गेले, यामुळे तो वाऱ्याच्या वेगाने जमिनीच्या दिशेने पडू लागला, यात पॅराशूटची दोरी आणखीनच एकमेकांत गुरफटली गेली. यावेळी तो एक्रो-पॅराग्लायडिंग ट्रिक करण्याच्या तयारीत होता, परंतु त्याला तसे करण्यात यश आले नाही.

केविन उंच पर्वतावरून उडी मारतो आणि काही वेळाने त्याचे पॅराशूट उघडते, परंतु पॅराशूटचे दोर त्याच्या शरीराभोवती अगदी विचित्र पद्धतीने गुरफटतात. केविन ते दोर जितक्या वेगाने सोडवण्याचा प्रयत्न करतो जे तितकीच अधिक गुंतत जातात, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

मृत्यूच्या गर्तात फसतो पण नंतर अशी करुन घेतो सुटका

अशा परिस्थितीत केविन वेगाने जमिनीवर पडू लागतो. व्हिडिओत पाहून शकता की, पॅराशूट न उघडल्याने कोविन जोरात जमिनीवर आदळणार असे वाटते, पण नंतर अचानक त्याच्या बॅगमधून एक भगव्या रंगाचे दुसरे पॅराशूट उघडते. हे पॅराशूट जमिनीपासून काही उंचीवर असताना उघडते, त्यामुळे तो कसा तरी जमिनीवर पोहचतो आणि त्याचा जीव वाचतो.

हेही वाचा : अभ्यास करताना आईपासून लपून मोबाईल वापरण्यासाठी मुलाचा अनोखा जुगाड; Video पाहून युजर्स म्हणाले, मन लावून…

व्हिडिओच्या शेवटच्या भागात पॅराशूटचे दोर एकमेकांमध्ये कशाप्रकारचे गुरफटले गेले आहेत हे दाखवले आहे. या घटनेबाबत फिलिपने लिहिले ‘हा मरणाचा दिवस नव्हता’. सोशल मीडियावर ३.९ दशलक्ष लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याचबरोबर अनेक युजर्सनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत.

बहुतेक युजर्सनी याला चमत्कार म्हटले आहे, पण हा व्हिडिओ जुना असल्याचे अनेकांचे मत आहे, जो आता पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.