Viral video: जंगलातून प्रवास करत असताना अनेक हिंस्र प्राण्यांचा सामना करावा लागतो. अशातच वाघ, सिंह, हत्तीसारखे प्राणी समोर दिसल्यावर अनेकांची पळता भुई झाल्याशिवाय राहत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, हा व्हिडीओ आतापर्यंत बऱ्याच लोकांनी पाहिलाय आणि शेअरसुद्धा केला आहे. मात्र, प्राण्यांच्या हल्ल्याचे व्हिडिओ अतिशय भयानक आणि थरकाप उडवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पिसाळलेल्या हत्तीने रागाच्या भरात अक्षरश: तीन मजली इमारत हलवली. अन् त्याच्या भितीनं लोकं अक्षरश: त्या इमारतीवरून खाली उड्या मारत होते. हत्तीचं हे रौद्र पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

ही घटना पश्चिम बंगालमधील डुआर्स या ठिकाणी घडली आहे. सुरुवातीला जंगलात एक हत्ती दिसतो. तो रागात आहे. मोठमोठ्याने ओरडून तो कुणाचा तरी पाठलाग करत आहे. इतक्यात हत्तीच्या पुढे एक व्यक्ती पळताना दिसते. हत्तीपासून जीव वाचण्यासाठी ही व्यक्ती पळते. पुढे तुम्ही हत्तीचं रौद्र रूप पाहू शकता. हा हत्ती इतका भडकला होता की त्यानं धडक देऊन तीन मजली इमारत कोसळण्याचा प्रयत्न देखील केला. हा आता ही इमारत अर्धवट बांधलेली दिसतेय. त्याला भिंती वगैरे नाहीयेत. पण तरी सुद्धा हत्तीला पाहून लोकांची भितीनं गाळण उडाली. लोकं अक्षरश: पहिल्या-दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारू लागले.

हिंस्र प्राण्यांचा मुक्तसंचार वाढला असून प्राणी माणसांवर हल्ला करत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. तसच काही लोक प्राण्यांना अमानुष मारहाणही करतात. त्यामुळे प्राणी मित्र संघटनांकडून या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी पुनर्वसन केंद्र सुरु करण्याची मागणी सुद्धा केली जात आहे. प्राण्यांना जंगलात सुरक्षित संचार करता यावं, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणीही केली जात आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ wildtrails.in नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “आपण त्यांच्या घरात गेल्यामुळे ते आपल्या घरात येत आहेत.” तर आणखी एकानं बापरे हे खूप भयंकर आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader