सोशल मीडियावर अनेकदा विचित्र आणि धक्कादायक व्हिडिओ समोर येत असतात. अनेकदा लोक स्टंटबाजी करण्याच्या नादात स्वत:चा जीव धोक्यात टाकताना दिसतात . अशाच एका व्हिडिओची सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती इमारतीवर चढलेला दिसत आहे आणि शेवटी जीवाची पर्वा न करता थेट उडी मारतो. हा सर्व धक्कादायक प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतक्या उंचावरून उडी मारूनही त्या इसमाला काहीही होत नाही हे पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे.

व्हिडिओ छत्तिसगडच्या दुर्ग भागातील आहे. इंदिरा मार्केटमध्ये घडलेल्या घटनेत एका चार मजली इमारतीच्या छतावर उभा असल्याचे दिसत आहे. हा छतावर उभ्या व्यक्तीला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. लोक त्याला ओरडून खाली उतरण्यास सांगत आहेत. पोलिसही घटना स्थळी उपस्थित होते आणि परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण तो व्यक्ती कोणाचेच ऐकत नाही. गर्दी जमताच, तेजराजने विटा आणि दगड फेकले आणि वाहनांचे नुकसान केले. पोलिस आल्यावर त्यांनी त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, पण व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे त्याने अचानक उडी मारली.

पोलिस काही करतील त्या आधीच तो व्यक्ती उंच इमारतीवरून उडी मारतो ज्यामुळे उपस्थितांसह पोलि‍सांनाही धक्का बसतो. जमिनीवर पडण्याऐवजी तो वीज प्रवाह सुरू असलेल्या तारेला धडकला, त्याला वि‍जेचा धक्का बसला आणि तो पहिल्या मजल्यावरील बाल्कनीत पडला. काही क्षणांसाठी, पाहणाऱ्यांना वाटले की, तो मेला आहे, पण तो उठला आणि त्यानंतर त्याचा तमाशा सुरू असतो.

या विचित्र घटनेने स्थानिकांना धक्का बसला आहे. एक व्यक्तीने ही घटना त्यांच्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड केली आणि नंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

तेजराज नायक असे या माणसाचे नाव असून तो ओडिशातील कालाहांडी येथील रहिवासी आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तो त्याच्या मुलावर वैद्यकीय उपचार घेण्यासाठी हैदराबादहून दुर्ग येथे आला होता पण त्या भागातील सरकारी रुग्णालयात मुलाला सोडल्यानंतर, तो इमारतीवर चढला आणि त्याला हा तमाशा सुरु केला असे म्हटले तरी गैर ठरणार नाही.

व्हायरल व्हिडिओ येथे पहा:

कोतवाली पोलिस स्टेशनचे प्रभारी विजय यादव यांनी त्यांना पकडण्यात यश मिळवले, परंतु तेजराकला धक्का बसला आणि त्यांनी पुन्हा उडी मारली. अखेर त्यांना जबरदस्तीने पकडण्यात आले आणि त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

“दुर्ग जिल्ह्यातील कोतवाली पोलिस स्टेशन परिसरातील एका बहुमजली इमारतीवर एक माणूस चढत होता आणि उडी मारण्याचा इशारा देत होता. लोक त्याला खाली येण्याचा सल्ला देत होते, पण तो खाली उतरला नाही,” असे एएसपी सिटी भिलाई दुर्ग सुखनंदन राठोड यांनी सांगितले.

“उच्च दाबाच्या तारेचा शॉर्ट सर्किट झाल्यामुळे त्याने (तेजराज) लोकांसमोर उडी मारली आणि तो पहिल्या मजल्यावरील बाल्कनीत पडला आणि काही वेळाने उभा राहिला. काही वेळाने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले,” राठोड म्हणाले.

अधिकाऱ्यांनुसार, तेजराज गंभीर जखमी झाला नव्हता आणि त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले होता.

“तो आता सुरक्षित आहे, त्याचे कुटुंबीय त्याला घेऊन जात आहेत. हा तरुण ओडिशातील कालाहांडी येथील रहिवासी आहे. तो ट्रेनने प्रवास करत होता, त्याचा मुलगा आजारी पडला आणि तो ट्रेनमधून खाली उतरला होता” असे एएसपी राठोड म्हणाले.

तेजराज नायकच्या कुटुंबाने त्याला घरी नेले आहे, परंतु त्याच्या अनियमित वर्तनामागील नेमके कारण अद्याप अज्ञात आहे.

Story img Loader