काहींना जीवाशी बेतणारा स्टंट करण्याची हौस असते. जीवाचीही पर्वा न करता असे स्टंट करणारे अनेक स्टंटमन असतील. असाच काहीसा स्टंट करण्याचा प्रयत्न एका तरूणाला चांगलाच महागात पडला. या तरूणाने धबधब्यावरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला पण स्टंट करण्याच्या नादात त्याची शुद्ध हरपली. अखेर प्रसंगावधानता दाखवून या तरुणाला दोन पर्यटकांनी वाचवून किना-यावर आणले. हवाईमधल्या एका धबधब्यावर हा प्रकार घडला. या धबधब्याची उंची जवळपास २०० फूट असल्याचे म्हटले जाते.
मूळचा कॅलिफोर्नीयाचा असणारा हा २१ वर्षीय तरूण आपल्या काही मित्रांसोबत हवाई बेटांवर सहलीसाठी आला होता. येथील प्रसिद्ध धबधब्यावर आला असता त्याने आपण स्टंट करणार असल्याचे जाहिर केले. आपल्या एका मित्राच्या हातात कॅमेरा देत त्याने स्टंटचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला सांगितले. धबधबा जेथून खाली कोसळतो त्या ठिकाणी तो उभा राहिला आणि थेट खाली उडी मारली. पण उडी मारल्यानंतर मात्र त्याची शुद्ध हरपली. याचवेळी दोन पर्यटकाने धाव घेत त्या तरुणाला वाचवले. त्याच्या अंगाशी आलेल्या या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मुलाला पाण्यातले स्टंट कसे करायचे हे माहित नव्हते फक्त व्हिडिओ काढण्यासाठी त्याने पाण्यात उडी मारली. हा स्टंट करण्याच्या नादात त्याचा शरीराला काही जखमाही झाल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा