सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक ठिकाणी अनेक उपाययोजना केल्या जातात. आता हेच बघा ना विमानतळापासून मॉलमध्ये, सिनेमाहगृह ते ऑफिस, देऊळ अशा अनेक ठिकाणी स्कॅनिंग मशीन्स बसवल्या आहे. येथे माणसांची तर तपासणी होतेच पण त्यांच्या सामानांची देखील तपासणीही केली जाते. यासाठी वेगळ्या बॅग स्कॅनिंग मशीन्स बसवल्या आहेत. आता आपल्यासारख्या लोकांना याची सवय झाली आहे. त्यामुळे स्कॅनिंग मशीन्स जवळ आल्यावर काय करायचे हे आपल्याला माहित असते.
पण काही लोक असे आहेत की ज्यांना नक्की काय करायचे हेच माहिती नसते, त्यामुळे मशीन्सपाशी आले की ते गडबडून जातात. पण आता सोशल मीडियावर जो व्हिडिओ फिरतो तो म्हणजे या सगळ्यांहूनही कहरच म्हणावा लागेल. ‘Epic LMAO’ या फेसबुक पेजवर एक सीसीटीव्ही फुटेज टाकण्यात आले आहे. हे फुटेज पाहून तुम्ही डोक्यावर हात मारला नाही तर नवलच म्हणावे लागेल. स्कॅनिंग मशीनसमोर आल्यावर नक्की काय करायचे हे माहित नसल्याने या व्यक्तीने असे काही केले ते पाहिल्यावर अनेकांना हसू आवरलेच नाही. हा व्यक्ती स्कॅनिंग मशीनजवळ आला, पण त्याला नेमके काय करायचे होते हेच माहित नव्हते. त्यामुळे तो तसाच चालत पुढे आला पण सुरक्षारक्षकाने त्याला काही सूचना करत पुन्हा स्कॅनिंग मशीनजवळ पाठवले. सुरक्षारक्षकाच्या सुचना लक्षात न अल्याने गोंधळून गेलेल्या या व्यक्तीने चक्क स्कॅनिंग मशीनमध्ये बॅग घेऊन उडी मारली. पण तो ही करामत करत असपर्यंत इतरांना हा प्रकार लक्षात आला नाही. चक्क दुस-या बाजूने मशीनमधून या माणसाला बाहेर आलेले पाहून काही सेकंद सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. नंतर मात्र सगळ्यांनी डोक्यावर हात मारला. हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे हे समजू शकले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा