एका किशोरवयीन मुलाच्या हत्येनंतर फ्रान्समध्ये हिंसाचार सुरू झाला आहे. सलग तीन दिवस फ्रान्सची राजधानी पॅरीस धगघगतंय. फ्रान्सच्या विविध भागांमधून जाळपोळ आणि दगडफेकीच्या बातम्या समोर येत आहेत. जमावाकडून पोलिसांवर हल्ले सुरू आहेत. अनेक ठिकाणी पोलीस आणि सुरक्षा दलांवर हल्ले झाल्याची प्रकरणं आतापर्यंत समोर आली आहेत. देशात आतापर्यंत शेकडो गाड्यांची आणि बसेससची जाळपोळ करण्यात आली आहे. फ्रान्समधल्या हिंसाचाराचे व्हिडीओ समोर येत आहेत. हे व्हिडीओ पाहून धक्का बसू शकतो. अशातच एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

फ्रान्समधील हिंसाचाराचे वेगवेगळे व्हिडीओ समोर येत आहेत. अशातच दंगलीदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पोलीस आणि दंगलखोरांमध्ये रस्त्यावर झडप सुरू असल्याचं दिसत आहे, तर रस्त्याच्या बाजूला असलेल्या फूटपाथवर एक माणूस निवांतपणे बसून सँडविच खाताना दिसतोय. फ्रान्सच्या नॅनटेरे शहरातली ही घटना आहे. दरम्यान, या दंगलीवेळी दंगलखोरांसमोर पोलिसांना माघार घ्यावी लागली असल्याचं वृत्त ली मोंडे या वृत्तपत्राने दिलं आहे.

communal tension erupt after stone pelted during ganesh immersion procession
भिवंडीत विसर्जन मिरवणूकी दरम्यान दगडफेक; तणावाचे वातावरण, पोलिसांकडून मध्यरात्री लाठीमार
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
thackeray group criticized pm narendra modi
“पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा रशिया-युक्रेन युद्धाची काळजी” ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले…
fresh violence erupts in manipur
मणिपूर पेटले; मोर्चाला हिंसक वळण, ४० विद्यार्थी जखमी; तीन जिल्ह्यांत संचारबंदी
Super Typhoon Yagi Videos
Super Typhoon Yagi: खिडक्या आणि गाड्या उडाल्या, झाडं-घरं कोलमडली; चक्रीवादळाच्या तडाख्यात व्हिएतनाममध्ये हाहाकार
Loksatta anvyarth Manipur two bomb attacks Anti drone system activated
अन्वयार्थ: चर्चा हाच पर्याय हे आता तरी पटले?
passenger gold Jewellery worth rs 2 75 lakh stolen in bus traveling in a konduskar travels from kalyan
कल्याण-कोल्हापूर कोंडुस्कर ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये प्रवाशाचा ऐवज चोरीला
Dombivli Kalyan Roads, Dombivli dust,
डोंबिवली, कल्याणमध्ये प्रवासी धुळीने हैराण

हिंसाचाराचं कारण काय?

फ्रान्समधल्या या हिंसाचाराला मंगळवारपासून (२७ जून) सुरुवात झाली आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसचं उपनगर असलेल्या नॅनटेरेमध्ये एका किशोरवयीन मुलाची पोलिसांनी हत्या केल्याचा आरोप आहे. वाहतूक नियम मोडल्याबद्दल एका पोलिसाने त्याच्यावर गोळी झाडली, जी त्याच्या छातीत घुसली, त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती देताना पोलिसानी सांगितलं की, या मुलाने पोलिसांच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला. मात्र, या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलीस खोटं बोलत असल्याचं स्पष्ट झालं. यामुळे लोक संतप्त झाले आणि थेट रस्त्यावर उतरले.

पाहा व्हिडीओ

गेल्या तीन दिवसांपासून फ्रान्समध्ये हिंसाचार सुरू असून यात आतापर्यंत २०० हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत, तर पोलिसांनी ४०० हून अधिक दंगलखोरांना अटक केली आहे.