Crocodile Attack Viral Video : पाळीव प्राण्यांसोबत मस्ती करतानाचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण काही माणसं रील बनवण्यासाठी जीवघेणा हिंस्र प्राण्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. आपल्या जीवाला धोका निर्णाम होईल,याची जराही भीती या लोकांना नसते. शिकारीच्या शोधात असणाऱ्या मगरीच्या तावडीत एखादा प्राणी किंवा माणूस सापडला की, मगर त्याला मृत्यूच्या दारात घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. एका माणसाने चक्क जिवंत मगरीच्या जबड्यात हात टाकल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रील बनवण्याच्या नादात या तरुणाने मगरीसोबत जीवघेणा खेळ करण्याचा प्रयत्न केला आणि काही सेकंदातच मगरीने जे केलं, ते पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मगरीचा हा थरारक व्हायरल व्हिडीओ @ranthambore_tours नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. एक व्यक्ती जिवंत मगरीचा जबडा उघडून त्यात हात टाकण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओत दिसत आहे. तोंडाच्या साहय्याने मगरीचा जबडा उघडून त्यात हात टाकल्यानंतर काही क्षणातच धक्कादायक प्रकार घडतो. मगर हल्ला करणार नाही, अशा अर्विभावात असणाऱ्या तरुणाची चांगलीच फजिती होते. मगरीच्या जबड्यात हात टाकताच काही सेकंदाच मगरीने हल्ला केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. पण सुदैवाने त्या तरुणाचा हात जबड्यात न अडकल्याने मगरीच्या हल्ल्यापासून त्या कसाबसा वाचल्याचं व्हिडीओत दिसत आहे. मगरीसारख्या खतरनाक प्राण्यासोबत जीवघेणा स्टंट करणे या तरुणाला चांगलेच महागात पडले असते. मगरीच्या जबड्यात तरुणाने हात टाकल्यानंतर मगरीने लगेच हल्ला केला. त्यामुळे रील बनवून हिरोगिरी करणाऱ्या तरुणाला मगरीने चांगलीच अद्दल घडवली.

नक्की वाचा – Viral Video : ३०० प्रवाशांनी भरलेल्या विमानाला अचानक लागली आग अन् घडलं…

इथे पाहा व्हिडीओ

इन्स्टाग्रामवर शेअर केलेला या मगरीच्या थरारक व्हिडीओला दीड लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच मगरीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटतकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “मी पाहिलेला आतापर्यंतचा सर्वात खतरनाक व्हिडीओ.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, तो तरुण प्रत्येक वेळी नशिबवान नसणार आहे. या रीलपासून त्याने धडा घ्यावा.” कुणीही अशाप्रकारची धोकादायक स्टंटबाजी करु नये, असा सल्लाही काही नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man keeps his hand in crocodile mouth fraction of seconds crocodile attacks a man watch viral video clip on instagram nss