Man Kicked Out From Plane For Farting: प्रवासाच्या वेळी काही बेजबाबदार सहप्रवाशांमुळे होणारा त्रास आपण प्रत्येकानेच अनुभवलेला असेल. लोकल ट्रेन, बस, लांब पल्ल्याच्या गाड्या यामध्ये इतरांची सोय बघणं तर सोडा पण किमान त्रास होईल असं वागू नये याचाही अनेकांना विसर पडलेला असतो. त्या तुलनेने विमान प्रवास हा एकार्थी थोडा चैनीचा मानला जातो. पण अलीकडेच घडलेल्या एका घटनेमध्ये विमान प्रवासात सुद्धा एका व्यक्तीच्या बिघडलेल्या पोटामुळे अन्य प्रवाशांना अक्षरशः नाक मुठीत घेऊन बसावे लागले होते. इंडिपेन्डन्टने एका रेडइट युजरच्या पोस्टच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार सदर घटना अमेरिकन एअरलाईन्स मध्ये घडली होती. १४ जानेवारी रोजी फिनिक्स, ऍरिझोना येथून ऑस्टिन, टेक्सासला जाणाऱ्या विमानात प्रवासाच्या दरम्यान हा प्रकार घडला होता.
नेमकं घडलं काय?
रेडइट युजरने केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “प्रवासाच्या आधी प्रत्येक जण आपापली जागा घेत असताना एक व्यक्ती काहीतरी पुटपुटत होती. अचानक त्याने चिडून अशी कमेंट केली की, “तुम्हाला हे असभ्य वाटत असेल तर आता या वासाचं काय कराल?” आणि यानंतर चक्क त्याने विमानात वायू उत्सर्जन केले. इतर प्रवाशांनी यावर हसून खरंतर दुर्लक्ष केलं होतं पण त्यावर तो आणखी चिडला आणि आरडाओरडा करू लागला त्याने त्याची स्नॅक्सची पाकिटे खोलून खायला सुरु केली. आणि वर तो सगळ्यांना कुत्सितपणे म्हणाला तुम्ही आता सुगंधित खाण्याची मजा घ्या. शेवटी वैतागून एकाने त्याला उत्तर देत म्हटले की तुला एवढाच त्रास असेल तर तू खासगी विमानाने फिर. ज्यावर ‘फार्टमॅन’ असे उत्तरला की तुम्ही खूप उद्धट आहात.”
दरम्यान, धावपट्टीवरून उड्डाणासाठी विमान तयार होत असतानाच काही कारणाने थांबवण्यात आले. त्यानंतर विमानात क्रू कडून घोषणा करण्यात आली की, “आम्ही व्यत्ययाबद्दल दिलगीर आहोत, परंतु आपण गेटवर परत जात आहोत. आम्हाला अधिक माहिती मिळताच आपल्याला पुढील अपडेट्स देण्यात येतील. ” अचानक त्यानंतर एका महिला फ्लाइट अटेंडंटने गॅस सोडून इतरांना त्रास देणाऱ्या प्रवाशाला असे सांगितले की त्याला विमानातून बाहेर पडावे लागणार आहे. जेव्हा त्याने त्याला विमानातून का काढले जात आहे याबाबत प्रश्न केला तेव्हा क्रू मेंबरने उत्तर दिले की ते खाली उतरल्यावर याबद्दल चर्चा करू.
Reddit युजरने सांगितले की, त्याला क्रू मेंबरने सांगताच तो उठला, बॅग घेतली आणि विमानातून निघून गेला. त्याला काढून टाकल्यावर आम्ही सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मला वाटतं की सगळेच तो आता पुढे काय बोलणार याचा विचार करत होते. दरम्यान प्रवासाला फक्त १५- ३० मिनिटे उशीर झाला होता, त्यामुळे मला वाटते की अमेरिकन (एअरलाइन्स) ने हे प्रकरण नीट व त्वरीत हाताळले.”
हे हा वाचा << Video: काही तासांआधी शोधलेला लघुग्रह अचानक पृथ्वीवर आदळला अन्.. कॅमेरात कैद झाला अविश्वसनीय क्षण
दरम्यान युजरने सदर प्रकार हा मनोरंजक वाटला म्हणून शेअर करत आहे असे सांगत पोस्ट केली होती. त्याने या प्रकरणाचा कोणताही व्हिडीओ शूट केलेला नाही. ही पोस्ट व्हायरल होताच अनेकांनी आपल्याला सुद्धा आलेले असे अनुभव शेअर केले आहेत. काहींनी तर फार्टमॅनच्या हिंमतीचा हेवा वाटतो असे म्हणत त्याला टोला लगावला आहे. तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटते हे कमेंट करून कळवा.