कोणतंही काम करताना त्यात एकाग्रता आणि पूर्ण लक्ष असणं गरजेचं असतं. असच काम आपण मन लावून करत असताना अचानकपणे एखादी व्यक्ती तुमच्या बाजूला येऊन उभी राहिली तर सहाजिकचं आपल्याला भीतीने धक्का बसेल, तसाच काहीसा प्रकार अमेरिकेतील लुइव्हिल या शहरात घडला आहे. मात्र येथे जो प्रकार घडला तो वाचल्यानंतर त्या घटनेवर संताप व्यक्त करावा की हसावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तर लुइव्हिल शहरात घडलेली घटना अशी की, या शहरातील एक महिला पत्रकार बातमीचं लाइव्ह वार्तांकन करत असताना एक अज्ञात व्यक्ती अचानक तिच्याजवळ आला आणि त्याने या महिलेच्या गालावर किस केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला पत्रकार गोंधळून गेली. मात्र तिने तिचं वार्तांकन सुरुच ठेवलं.

या संबंधित प्रकारानंतर या महिला पत्रकाराने त्या व्यक्तीचा शोध घेत त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली.सोबतच ट्विटरवर या घटनेचा व्हिडीओही शेअर केला. या महिलेला किस करणाऱ्या व्यक्तीचं नाव एरिक गुडमॅन असं असून त्याचं नाव सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याने या महिला पत्रकाराची जाहीरपणे माफी मागितली.

दरम्यान, ‘जेथे तुम्ही वार्तांकन करत होतात, त्यावेळी मी बॅचलर पार्टी करण्यासाठी जात होतो. मात्र त्यावेळी मी थट्टा-मस्करी करण्याच्या मूडमध्ये असल्याने माझ्याकडून ही चूक झाली. हे अत्यंत चूक होतं. तुमचा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका पत्रकाराचं काम किती कठीण असतं याचा अंदाज मला आला. तुमच्या कामात मी व्यत्यत आणला त्याबद्दल क्षमस्व’. एरिकने मागितलेल्या माफीनंतर या महिला पत्रकाराने त्याला माफ केलं आहे.

 

Story img Loader