Viral video: काही लोकांना बाहेर गेल्यावर कसं बोलायचं कसं वागायाचं याचं बिलकूल भान नसतं, ते वारंवार आपल्या कृतीतून हे सिद्ध करतात. अशाच एका व्यक्तीचा अश्लिलपणा समोर आला आहे. अनेकवेळा असे व्हिडिओ सोशल मीडियावर येतात, जे धक्कादायक असतात. नुकताच असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुकानात बसलेल्या महिलेला जबरदस्तीने किस करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला दुकानात खरेदी करताना दिसत आहे. तिथेच एक व्यक्ती येऊन तिच्या शेजारी बसते. यानंतर तेथे उपस्थित दुकानदार माल आणण्यासाठी जातो. दुकानदार तिथून निघून जाताच तो माणूस जबरदस्तीने महिलेचे चुंबन घेऊ लागला. त्याचवेळी, महिला पुरुषाला स्वतःपासून दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते, परंतु तो तरीही तिच्यावर जबरदस्ती करतो. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> वऱ्हाड्यांसमोर मेहुणीनं किस केलं अन् पुढच्याच क्षणी लग्न मोडलं; Video पाहून लावाल डोक्याला हात

हा व्हिडिओ एक्सवर शेअर करण्यात आला असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.व्हायरल होत असलेल्या या सीसीटीव्ही व्हिडिओवर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने कमेंट केली की, ‘हे खूप भयानक होते…, दुसर्‍या यूजरने लिहिले, ‘अशा लोकांवर कारवाई व्हायला हवी.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man kissed woman in an store cctv footage went viral watch video srk