सापाला पाहिलं तरी आपल्याला घाम फुटतो. त्याच्या जवळ जाणं तर दूरच राहिलं. पण काही लोक असे आहेत ज्यांच्यासाठी साप म्हणजे खेळणंच. सापासोबत खेळणाऱ्या काही लोकांचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. त्यातल्या त्यात किंग कोब्रा हे नाव जरी ऐकलं अंगाचा थरकाप उडतो. हा कोणता साधा साप नाही तर तो कोब्रा साप आहे. किंग कोब्रा हा इतका खरतनाक असतो की त्याचा दंश होताच व्यक्ती मरतो. कारण तो इतर सापांपेक्षाही खूपच विषारी आहे. ज्यामुळे त्याच्यापासून लांबच राहिलेलं बरं. पण काही व्यक्तींना ही मोठी रिस्क घेण्याची भारीच हौस असते. कधी कधी ही हौस जीवाशी येते. एका तरुणाने तर चक्क किंग कोब्राला किस करण्याची हिंमत केली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय.
अलीकडेच व्हायरल झालेला हा भयानक व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहेत. या व्हिडीओमध्ये फणा काढून उभा असलेला किंग कोब्रा दिसत आहे. कोब्रा साप हा इतका भयंकर आहे की तो चावला तर की काही वेळातच त्याचा मृत्यू होऊ शकतो. अशा सापासमोर स्वतःच हा तरुणा गेला. फक्त त्याच्या जवळ गेलाच नाही तर त्याच्या माथ्यावर किसही करू लागला. व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकी भरेल, घाम येईल आणि अंगावर काटाही येईल. हा तरूण सापाच्या जवळ जाताच आपलं तोंड तो त्याच्या माथ्याजवळ नेतो आणि त्याला किस करतो. यावेळी आपल्या काळजाचं पाणी पाणी होतं.
पण सुदैवाने साप त्याला काही करत नाही. इतक्या खतरनाक सापाने या तरुणाला काहीच कसं केलं नाही, असा प्रश्न तुम्हाला पडलं असेल. यामध्ये किंग कोब्राचे हावभाव पाहण्यासारखे आहेत, पण हे कृत्य खूप धोकादायक आहे, चुकूनही हे करण्याची चूक करू नका. हे जीवघेणे ठरू शकते.
आणखी वाचा : दोरीला लटकलेल्या गोणीशी खेळताना पांडा धापकन पडला, VIRAL VIDEO पाहून खळखळून हसाल
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : या मुलाने घराची भिंत नव्हे, वही किंवा कागद नव्हे तर पांढरी शुभ्र कार रंगवली!
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो पाहिल्यानंतर भीतीमुळे लोक घामाघूम होत आहेत. सर्पतज्ज्ञ वावा सुरेश यांच्या नावाचा उल्लेख करून हा धक्कादायक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
सुरेश हा केरळचा लोकप्रिय सर्पमित्र आहे, त्याने आतापर्यंत ३८ हजार साप पकडले आहेत. काही लोक या माणसाला ‘स्नेक मॅन ऑफ केरळ’ असेही म्हणतात. या व्यक्तीने आतापर्यंत १९० हून अधिक किंग कोब्राची सुटका केल्याचेही सांगितले जात आहे.