King Cobra Dangerous Video Viral : जगातील सर्वात विषारी सापांच्या लिस्टमध्ये किंग कोब्रा अव्वल स्थानी असेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण किंग कोब्राच्या विषाने जवळपास २० माणसांचा मृत्यू होऊ शकतो, असं तज्ज्ञ सांगतात. हल्ली काही सर्पमित्र सोशल मीडियावर रील्सचे व्हिडीओ करण्यासाठी जीव धोक्यात टाकून किंग कोब्रासारख्या विषारी सापाशी पंगा घेतात. थोडसं प्रकाशझोतात येण्यासाठी ही माणसं लाखमोलाचा जीव कवडीमोल करतात. असाच काहिसा धक्कादायक प्रकार एका व्हायर व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला आहे. सापांचं व्यसन लागलेल्या एका तरुणाने सर्वात विषारी साप किंग कोब्रालाच किस करण्याचा प्रयत्न केला अन् पुढं जे काही घडलं ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
@nickthewrangler नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर किंग कोब्राचा हा खतरनाक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर भन्नाट कॅप्शनही देण्यात आलं आहे. “पहिलं किस केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं”, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओत पाहू शकता की, एक किंग कोब्रा विळखा घालून बसलेला असतो. त्यानंतर एक तरुण सापाच्या पाठीमागे जात त्याच्या फण्यावर किस करतो. पण विशेष म्हणजे फण्याला स्पर्श केल्यानंतर कोब्राने तरुणाला चावा घेण्याचा प्रयत्न केला नाही, हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
कारण किंग कोब्रासारखा साप दूरवर असलेल्या माणसाच्या अंगावर धाऊन जातो आणि त्याला चावण्याचा प्रयत्न करतो. पण या व्हिडीओत काहीसं वेगळं पाहायला मिळत आहे. तरुणाने स्वत:चा जीव धोक्यात टाकून किंग कोब्राल किस केलं. हा भयानक व्हिडीओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.व्हिडीओला प्रतिक्रिया देत एका यूजरने म्हटलंय, तो साप तुला चावला कसा नाही? साप तितके सुंदर नसतात. तर दुसऱ्या एका यूजरने म्हटलंय, निक तू खूप धाडसी आहे. तर अन्य एक यूजर म्हणाला, हे खूप भीतीदायक आहे, पण हा माझा आवडता व्हिडीओ आहे.