किंग कोब्रा. सर्पाच्या अनेक खतरनाक जातींपैकी आणखी एक सर्वाधिक विषारी आणि खतरनाक अशी प्रजाती. साधासुधा सापाला घाबरणारे तर किंग कोब्राला पाहून असेच बेशुद्ध पडतील. काहींना तर स्वप्नात जरी साप दिसला, तरी दचकून जाग येते. साप म्हटलं की भल्याभल्यांच्या अंगाला दरदरून घाम फुटतो. पण काही लोक असे आहेत, ज्यांना सापाची बिलकुल भीती वाटत नाही.
काही माणसांसाठी साप म्हणजे एकप्रकारे खेळणंच झालं आहे. पण सापांबरोबरचा खेळ कधी जीवघेणा होईल, याचा अंदाज लावता येणार नाही. सापांसोबत मस्ती करुन त्यांचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पण हा वेडेपणा काही तरुणांच्या अंगलट आल्याच्या धक्कादायक घटनाही घडल्या आहेत. अशाच प्रकारचा सापाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
साप म्हणजे एकप्रकारे खेळणंच
एक व्यक्ती नदीच्या काठावर बसलेला दिसतो. त्याच्यासोबत 12 फूट लांब किंग कोब्राही आहे. तो या विषारी सापाशी लहान मुलासारखा खेळताना दिसतो, नंतर तो मागून हळूवारपणे सापाला किस करताना दिसतो. विशेष म्हणजे साप यावर कोणतीही हिंसक प्रतिक्रिया देत नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावरही काटा उभा राहील.
पाहा थरारक Video
हेही वाचा – Viral video: थरारक! तहान भागवण्यासाठी आलेल्या हरणावर वाघाचा हल्ला; जबड्यात पकडून…
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, ‘भावा, प्लिज एवढी रीस्क घेऊ नको.’ तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, ‘हा काय वेडेपणा आहे?’. सापाच्या व्हिडीओला हजारो व्यूज मिळाले असून व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.