आपल्या आजूबाजूला असे अनेक प्राणी असतात ज्यांच्याजवळ जाण्याची कोणीही हिंमत करत नाही. एकदा का कोणी त्यांच्या जवळ गेला तर त्या व्यक्तीची काही खैर नसते. मात्र काही लोकं धाडस दाखवत या प्राण्यांजवळ जातात. त्यानंतर त्या व्यक्तीसोबत जे काही होईल ते त्याच्या नशिबावर अवलंबून असते. सध्या सोशल मिडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावर नक्की काटा येईल. या व्हिडिओमध्ये एक डुप्लीकेट मगरीचा पोशाख घातलेला एक माणूस त्याच्याजवळ आला आणि नंतर त्याची छेड काढू लागला. त्यानंतर काय झाले ते पाहून तुमचाही थरकाप उडेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माणूस चक्क मगरीजवळ झोपला

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ लोकांनी पाहिला तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मगरीजवळ जाण्याचे धाडस सहसा कोणी करत नाही पण या व्यक्तीने केलेले धाडस पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मगरीचा डुप्लीकेट पोशाख घातलेला एक व्यक्ती त्याच्या अगदी जवळ झोपला आहे. मात्र, शेजारी माणूस झोपल्याचे मगरीला अजिबात जाणवले नाही. त्याला मगरीला वाटले असेल की कोणीतरी आपल्यातलाच एखादा मित्र शेजारी झोपला असेल.

( हे ही वाचा: Video: टॉवेल गुंडाळून ‘तो’ थेट मेट्रोत शिरला; आत जाताच असं काही केलं की मुलींनी तोंडच लपवली)

माणसाच्या विचित्र कृती पाहून सर्वजण थक्क झाले

हा व्यक्ती फक्त या मगरीसोबत झोपला नाही तर या पठ्याने चक्क स्वतःच्या पोशाखाखालून हात काढून खऱ्या मगरीचे पाय ओढायला सुरुवात केली. त्या व्यक्तीने एक-दोनदा नव्हे तर अनेक वेळा मगरीचे पाय ओढले. खरं तर मगरीला सुगावा लागला असता, तर कदाचित ती हल्ला करू शकली असती, मात्र व्हिडिओमध्ये तरी तसं दिसत नाही आहे. मात्र या माणसाने असे विचित्र धाडस दाखवत अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: भंगारात गेलेल्या स्कुटरची अनोखी कमाल! देसी जुगाड पाहून आनंद महिंद्रा म्हणाले ” मला…”)

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर adultsociety नावाच्या अकाऊंटने शेअर केला असून आत्तापर्यंत त्याला एक लाख ५० हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man lay down near a crocodile wearing a fake costume video goes viral gps