(viral video) हल्ली सगळेच रीलस्टार होण्याचं स्वप्न पाहतात. प्रत्येक जण काहीतरी हटके करण्याच्या प्रयत्नात असतो. तसेच रील बनवण्यासाठी आणि ती रील व्हायरल होण्यासाठी वेगवेगळे स्टंटसुद्धा करतात. मग हा स्टंट आपल्या जीवाववर बेतेल याची चिंता कुणीही करत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय आहे या व्हिडीओमध्ये video?

या व्हिडओमध्ये चालक आपली Mahindra XUV700 चालवत आहे. यावेळी त्यानं आपली कार अ‍ॅडव्हान्स ड्राइवर असिस्टेंस सिस्टम मोडवर टाकली आहे. आपण पाहतो आजकाल रस्ते अपघाताच्या प्रमाणात प्रचंड वाढ झालीय. हे असेच अपघात कमी करण्याच्या हेतूनं तयार करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानाचा कार चालक मात्र गैरवापर करताना दिसत आहे. कारण हा चालक आपली कार अ‍ॅडव्हान्स ड्राइवर असिस्टेंस सिस्टम टाकून आपल्या पत्नीसोबत चाळे करत इंस्टाग्रामवर रील करताना दिसत आहे. यावेळी तो कधी पत्नीशी चाळे करत आहे तर मध्येच आपले दोन्ही पाय तिच्या सीटवर टाकून बसत आहे. आणि हे करताना त्यानं कारचं स्टेअरिंग पूर्णपणे सोडून दिलं असून त्याचं रस्त्याकडेही बिलकुल लक्ष नाही.

कारमध्ये मागच्या सीटवर बसून एक व्यक्ती हा व्हिडीओ रेकॉर्ड करत आहे.. इन्स्टाग्रामवर अफसर घुडासी (afsar_ghudasi44) या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आता वेगवेगळ्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून अनेक युजर्सनी हा व्हिडीओ बघून संताप व्यक्त केलाय. राजस्थानमधील सवाई माधोपूर पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेतली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

​ADAS सेफ्टी फीचर म्हणजे काय?

तुम्ही ADAS सेफ्टी फीचर्सबद्दल अनेकदा ऐकत असाल. हे फीचर पूर्वी केवळ प्रीमियम कारमध्ये दिलं जायचं. मात्र आता हे फीचर्स परवडणाऱ्या वाहनांमध्येही मिळू लागलं आहे. हे फीचर म्हणजे वाहनामध्ये एका सॉफ्टवेअर सिस्टिमचा समावेश केलेला असतो, जी सिस्टिम आपोआप काम करते. कारमध्ये देण्यात आलेले कॅमेरे, रडार आणि इतर सेन्सर्सच्या सहाय्याने कार नियंत्रित केली जाते. अनेकदा गाडी चालवताना लोकांचं लक्ष विचलित होतं आणि अपघात होतात. अशा प्रकारच्या अपघातांपासून ही यंत्रणा तुम्हाला वाचवू शकते. मात्र त्याचा गैरवापर कराल तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा – चेहरा अचानक लाल पडतोय ? हे सौंदर्य नाही तर आहेत ‘या’ गंभीर आजाराची लक्षणं, आजच करुन पाहा हे उपाय

या व्हिडिओला आतापर्यंत 7 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man leaves cars steering wheel while driving to make instagram reel with wife internet blasts him srk