सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. काही व्हिडीओ पाहून डोक्यावर हात मारण्याची वेळ येते. तर काही व्हिडीओ पाहिल्यानंतर पोट धरून हसावं लागतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर खोटं बोलण्याच्या काही मर्यादा असतात की नाही, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. व्यक्तीचे हावभाव पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडीओतील व्यक्ती हुंड्यात सासरचे चक्क ट्रेन देणार होते, अशी बढाई मारताना दिसत आहे. नकार दिल्याचे कारण ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल.
व्हिडीओतील व्यक्ती सांगत आहे की, ‘त्याच्या सासरच्या लोकांनी त्याला हुंड्यात ट्रेन देऊ केली होती. ही गोष्ट पूर्णपणे खरी आहे.’ त्यानंतर त्याला विचारलं की, त्याने ती घेण्यास नकार का दिला? तेव्हा तो म्हणला “मला ट्रेन कशी चालवायची हे माहित नव्हते, म्हणून मी नकार दिला. याशिवाय घरी ट्रेन उभी करण्यासाठी जागा नसल्यामुळे ट्रेन नेण्यास नकार दिला.”
नेटकरी असे मजेदार व्हिडीओ डोक्यावर घेतात. हा मजेदार व्हिडीओ युजर्स वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. एका युजरने लिहीलं आहे की, “खोटं बोलायची पण हद्द असते राव, ट्रेन काय रस्त्यावर चालवणार होता का?”. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, “मला तर हुंड्यात रॉकेट मिळणार होतं. पण बाइकवर फिरण्याची मजा काही वेगळीच आहे.”