Viral video: सोशल मीडिया हे माहितीचं प्लॅटफॉर्म आहे, येथे आपल्याला टेक्ट, फोटो आणि व्हिडीओ स्वरुपात माहिती मिळते. तर काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडिया हे माहिती आणि व्हिडीओचं भंडार आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. सध्या एक असाच व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला हसाव की रडावं हेच कळणार नाही.दारू पिणं हे शरिरासाठी किती हानिकारक आहे हे वेगळं सांगायला नको. गेली कित्येक दशकं दारूचे दुष्परिणाम आपण पहाता आलो आहोत. बरं, या दारू विरोधात मोठमोठ्या सामाजिक संस्था, वैद्यकिय तज्ञ, प्रशासन शिवाय शाळा, कॉलेजांमध्ये देखील जनजागृती केली जाते. पण दारूचं व्यसन काही सुटत नाही. कितीही कारवाया केल्या तरी दारुची तस्करी ही होतच असते. अशाच एका व्यक्तीने पोलिसांपासून दारु लपवून घेऊन जाण्यासाठी दारू अशा ठिकाणी लपवली की कुणाला शंकाही येणार नाही. मात्र पोलिसांनी ती शोधून काढलीच, याचा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दारु माणसाला काहीही करण्यासाठी भाग पाडू शकते. याच्या अनुभव बऱ्याच लोकांना आला असेल. तसेच तुम्ही काही लोकांना असं करता पाहिलं असेल. नेहमी शांत असलेली व्यक्ती अचानक दारु प्यायल्यानंतर वाघ बनते आणि आकाशातील चंद्र तारे तोडून आणण्याच्या बाता मारते. मात्र मुळात त्यांना यावेळी कशाचेच भान नसते. त्यांना स्वत:लाही धड सावरता येत नाही. दारुच्या मागे लोक इतके वेडे असतात की त्यांना कशाचीही भीती राहत नाही. अशाच एका व्यक्तीनी दारुची तस्करी करण्यासाठी मोठी रिस्क घेतली आणि फसला.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका टेम्पोमध्ये या व्यक्तीनं अशाप्रकारे दारुचे बॉक्स लपवले होते की कुणाला साधी शंकाही येणार नाही. मात्र पोलिसांच्या तावडीतून तो काही वाचू शकला नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल की पोलिसांना नेमकं कळलं तरी कसं?

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ motivation.line.daily नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला “प्रश्न हा नाही की त्यानं दारु त्याजागी ठेवली कशी…प्रश्न हा आहे की, पोलिसांना कळलं कसं” असं कॅप्शन लिहलं आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.