Viral video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ हसवणारे असतात; तर काही व्हिडीओ पाहून धक्का बसतो. अपघाताच्या तर रोजच वेगवेगळ्या घटना समोर येत असतात. प्रवास कोणत्याही वाहनाचा असो, प्रत्येकाला खिडकीशेजारची जागा हवी असते. ती जागा मिळाली की, हात आपोआप बाहेर काढला जातो. मात्र, हात असा खिडकीबाहेर काढणं कसं जीवावर बेतू शकतं हे नुकत्याच एका व्हिडीओतून समोर आलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. काही सेकंदांत घडलेली ही घटना पाहून काळजात धस्स होतं. अपघाताची ही घटना बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सोशल मीडियावर हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडीओ समोर आला आहे; जो पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक व्यक्ती बसमध्ये निवांत बसलेली दिसत आहे. त्या व्यक्तीनं खिडकीशेजारील सीटवर बसून, त्याचा हात खिडकीवर ठेवला आहे; जो थोडासा बाहेर आहे. मात्र, त्यानं खिडकीच्या बाजूला बसणं त्याच्या चुकीमुळे जीव धोक्यात घालणारं ठरलं. भरधाव असलेल्या त्या बसमध्ये निवांत बसलेल्या त्या व्यक्तीचा हात बाहेर असलेल्या खांबाला धडकतो आणि क्षणात त्याचा हात मोडल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. चार सेकंदांत नक्की हा अपघात कसा घडला हे त्या व्यक्तीलाही कळलं नाही. व्हिडीओमध्ये अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे, याबद्दलही माहिती मिळू शकलेली नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: ‘हे फक्त पुण्यातच होऊ शकतं’ परस्परांचे स्पर्धक झाले परस्परांचे मित्र; पुण्याच्या रस्त्यावर नेमकं काय घडलं पाहाच

हा व्हिडीओ jassoyee786 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

वाहतुकीच्या नियमांचं पालन आवश्यक

सध्या शहरात असो की गावाकडे सगळीकडेच रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. त्यामुळे रस्ता खोदण्यात आल्यानंतर वाहतूक एकाच बाजूनं चालू असते. हीच एकेरी वाहतूक धोकादायक ठरत आहे. वाहनचालकांनी गाडी थांबविताना आणि वळविताना हात बाहेर न काढता, इंडिकेटरचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच प्रवाशांनीही गाडी धावत असताना संभाव्य अपघात टाळण्यासाठी हात बाहेर काढण्याचा मोह टाळायला हवा. वाहतुकीच्या नियमांचे फलक आपण नेहमी वाचतो; मात्र त्यांचं पालन होताना दिसत नाही. खिडकीतून हात बाहेर काढणं, गाडी वेगानं चालवणं या छोट्या छोट्या चुका कशा जीवावर बेतू शकतात, हे या घटनेतून समोर आलं आहे. त्यामुळे प्रवास करताना प्रत्येकानं आपली काळजी घ्यावी आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं; ज्यामुळे अशा जीवघेण्या दुर्घटना टळतील.