सध्याच्या जमान्यात अनेकांना लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात सतावत आहे. अनेकजण सुरुवातीला आपल्या आहारावर नियंत्रण ठेवत नाहीत त्यामुळे त्यांना लठ्ठपणाच्या गंभीर समस्येला सामोरं जावं लागतं. मात्र, अनेक लोकं असेही असतात जे खूप व्यायाम करुन आपल्या आहारावर नियंत्रण ठेवून वजन नियंत्रित करतात. सध्या अशाच एका व्यक्तीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून त्याचा आताचा आणि जुना फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या व्यक्तीने एक दोन नव्हे तर तब्बल १६५ किलो वजन कमी केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तो व्यक्ती अमेरिकेतील मिसिसिपी येथील असून त्याचे नाव निकोलस क्राफ्ट वय ४२ असं त्याचं नाव आहे. जून २०१९ मध्ये त्याचे वजन सुमारे ६४९ पौंड म्हणजेच २९४ किलो होते. तर त्याने आपले वजन १६५ पेक्षा जास्त कमी केले आहे. क्राफ्टने सांगितले की, नैराश्यामुळे तो जास्त प्रमाणात खायचा त्यामुळे त्याचे वजन वाढले. शिवाय २०१९ मध्ये एका डॉक्टरने त्याला “टिकिंग-टाइम बॉम्बसारखा” असल्याचं सांगितलं होतं.
हेही वाचा- नशीबच भारी! शेतकऱ्याच्या घराचे PM आवास योजनेतून सुरु होते बांधकाम, पाया खोदताना सापडला खजिना
त्याने स्वत: याबाबतची माहिती देतना सांगितलं की, तीन वर्षांपूर्वी डॉक्टरांनी आयुष्यातील सर्वात वाईट बातमी दिली की, मी माझ्या वजनाच्या समस्येबद्दल काही केले नाही तर, मी ३ ते ५ वर्षांत मरणार आहे, हे एकताच मी बदल करण्याचा निश्चय केला. ज्या बदलामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. २०१९ मध्ये, क्राफ्टचे वजन ६४९ पौंड होते. आहारातील बदलामुळे त्याचे वजन कमी झाले. पहिल्या महिन्यातच त्याने ४० पौंड कमी केले. तेव्हा त्याच्या लक्षात आले की वजन कमी होऊ शकतं. शिवाय हे सर्व आपण आईच्या आणि कुटुंबांच्या मदतीने कल्याचंही त्याने सांगितलं.
जीव देण्याचा करत होता विचार –
हेही पाहा- मगरीच्या पिल्लावर हल्ला करायला गेला अन् काही क्षणात डाव पलटला, थरारक घटनेचा Video होतोय Viral
तर लठ्ठपणाला कंटाळून तो एका क्षणी जीवन संपवण्याचा विचार करत होतो असंही त्यांने सांगितलं, तो म्हणाला, माझ्या मनात आधी आत्महत्येचे विचार आले होते. मी माझ्या आजीशी मनातील गोष्ट बोललो त्यावेळी तिने मला एक सकारात्मक विचार करायला भाग पाडले. शिवाय क्राफ्टने वजन कमी करण्यासाठी धडपडणाऱ्यांसाठी हार मानू नका असा संदेश दिला आहे. तो म्हणाला, तुम्ही तुमचे मन ज्या गोष्टीवर केंद्रीत करता ती तुम्ही करु शकता आणि विश्वास ठेवा की तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकता. दरम्यान, क्राफ्ट आता त्वचा काढण्याची शस्त्रक्रिया करणार आहे, कारण त्याच्या सैल त्वचेमुळे त्याला त्रास होत आहे. मात्र, त्याला अजूनही काही चमत्काराची आशा आहे.