Mumbai local train accident viral video: मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करीत असतात. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात आणि मुंबईचेच होऊन जातात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं.

उशीर झाला म्हणून चालती ट्रेन पकडणारे प्रवासी, तर आपल्या पोटाची खळगी भरावी म्हणून लहानसहान वस्तू विकून दिवस ढकलणारे गोरगरीब आपल्याला दररोज पाहायला मिळतात. असं म्हणतात की, मुंबईची लोकल सगळ्यांनाच आपलंसं करते. म्हणून फक्त प्रवासच नाही, तर या लोकलमध्ये गाणीही गायली जातात. भजन, टाळ-मृदुंगाचे आवाज ऐकू येतात. दिवसभरात आलेला ताण, थकवा लोक लोकलमध्येच सोडून येतात म्हणून तर अनेकदा या गजबजाटातदेखील थकलेल्या शरीराला शांत झोप लागते.

हेही वाचा… VIDEO: काय हा प्रकार! डॉक्टरांनी वाजवल्या शिट्ट्या, तर काहींनी धरला ठेका! वैद्यकीय परिषदेत महिलेचा अश्लील डान्स

दिवसभरात आपलं काम करून घरी परतणारे अनेक लोक आपली झोप ट्रेनमध्येच पूर्ण करतात. ट्रेनच्या या प्रवासात, भरगच्च गर्दीत एखादी सीट मिळाली की, बसून एक शांत झोप घेईन, असा विचार मनातल्या मनात अनेक जण करीत असतात. म्हणून ट्रेन पकडल्यावर त्यात सीट मिळाली की, अनेकांना गड जिंकल्यासारखंच वाटतं. सध्या लोकलमधील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात एका माणसाला लोकलमध्ये गर्दीत सीट तर मिळाली; पण त्याचा डोळा लागताच घडलं असं काही की, ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत लोकलमधून अनेक प्रवासी प्रवास करीत आहेत. प्रत्येक जण आपापल्या विश्वात मग्न आहे. तसंच या ट्रेनमध्ये प्रवास करीत असताना एका माणसाला अगदी गाढ झोप लागली आहे. या गाढ झोपेत त्याला कसलंच भान राहिलं नाही. हळूहळू डुलकी घेत त्याचा तोल गेला आणि तो सीटवरून खालीच कोसळला. तो खाली पडताच सगळ्यांनाच धक्का बसला.

हा व्हिडीओ @nilesh.warang.56 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला तब्बल १४.८ दशलक्ष व्ह्युज मिळाले आहेत.

हेही वाचा… VIDEO: “देव कोणत्या रूपात…”, जिममध्ये अचानक एकावर पडला डंबेल अन्…, पुढे जे घडलं ते पाहून उडेल थरकाप

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर संताप व्यक्त केला. एका युजरने कमेंट करीत लिहिलं की, तो माणूस एवढा पडला; पण एक जणही त्याला उचलायला आला नाही. दुसऱ्यानं, “ही मजेदार गोष्ट नाही. तुम्ही त्यांना आधीच सावध करायला हवं होतं”, असं म्हटलं.